स्टील प्लेट गर्डर टाकण्यासाठी खंडवा रेल्वे मार्गावर ५ ते १२ डिसेंबरपर्यंत पॉवर ब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 01:20 PM2018-12-05T13:20:47+5:302018-12-05T13:22:50+5:30

अकोला: स्टील प्लेटचे गर्डर टाकण्याचे काम सुरू होत असल्याने खंडवा रेल्वे मार्गावर ५ डिसेंबर रोजी आणि ८ डिसेंबर रोजी काही काळासाठी लोहमार्ग पॉवर ब्लॉक करण्यात येणार आहे.

Power block from Khandwa Railway on 5 to 12 December | स्टील प्लेट गर्डर टाकण्यासाठी खंडवा रेल्वे मार्गावर ५ ते १२ डिसेंबरपर्यंत पॉवर ब्लॉक

स्टील प्लेट गर्डर टाकण्यासाठी खंडवा रेल्वे मार्गावर ५ ते १२ डिसेंबरपर्यंत पॉवर ब्लॉक

Next

अकोला: स्टील प्लेटचे गर्डर टाकण्याचे काम सुरू होत असल्याने खंडवा रेल्वे मार्गावर ५ डिसेंबर रोजी आणि ८ डिसेंबर रोजी काही काळासाठी लोहमार्ग पॉवर ब्लॉक करण्यात येणार आहे.
५ डिसेंबर रोजी खंडवा रेल्वे स्टेशनवर १०.३५ ते १६.२५ पर्यंत धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ५ डिसेंबर रोजी प्रस्थान करणारी ५११८७ क्रमांकाची डाउनकडे जाणारी भुसावळ-कटनी रेल्वेगाडी रद्द करण्यात आली आहे. तसेच ८ डिसेंबर रोजी धावणारी ५११८८ क्रमांकाची अपकडे जाणारी भुसावळ रेल्वेगाडीदेखील रद्द केली गेली आहे. त्याच सोबत ५१६८६ अपची आणि ५१६८५ क्रमांकाची खंडवा-बीर रेल्वेगाडीही रद्द करण्यात आली आहे.
५ डिसेंबर रोजी धावणारी ११०६७ क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनल-फैजाबाद साकेत एक्स्प्रेस १४.०० ते १६.२५ पर्यंत बगमार स्टेशनवरून सोडली जाईल. १२७७९ क्रमांकाची वास्को निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस १४.३५ ते १६.२५ थांबवून पाठविली जाईल. १५०१७ क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनल-गोरखपूर काशी एक्स्प्रेस १५.३५ ते १६.२५ थांबवून मांडवा स्टेशनवरून सोडण्यात येईल. प्रवाशांना होणाºया असुविधेबाबत रेल्वे मंडळाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

भुसावळ-नागपूर पॅसेंजरही रद्द

मध्य रेल्वे विभागात काही तांत्रिक आणि देखभालीसाठी ५ डिसेंबरची भुसावळ-नागपूर पॅसेंजर गाडी रद्द करण्यात आली आहे. ५१२८५ क्रमांकाची डाउनकडे धावणारी भुसावळ-नागपूर पॅसेंजर रेल्वे आणि ५१२८६ क्रमांकाची भुसावळ पॅसेंजर रेल्वे रद्द करण्यात आल्याचे भुसावळ रेल्वे मंडळाकडून कळविण्यात आले आहे.

 

Web Title: Power block from Khandwa Railway on 5 to 12 December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.