वीज ग्राहकांना मोबाइलवरच सेवा!

By admin | Published: June 4, 2017 01:45 PM2017-06-04T13:45:17+5:302017-06-04T13:45:17+5:30

३.३१ लाख ग्राहकांनी केली नोंदणी : नोंदणी करण्याचे महावितरणचे आवाहन

Power consumers serve mobile! | वीज ग्राहकांना मोबाइलवरच सेवा!

वीज ग्राहकांना मोबाइलवरच सेवा!

Next

३.३१ लाख ग्राहकांनी केली नोंदणी : नोंदणी करण्याचे महावितरणचे आवाहन
अकोला : महावितरणच्या प्रणालीमध्ये मोबाइल क्रमांक नोंदविलेल्या वीज ग्राहकांना अनेक सुविधांचा लाभ घरबसल्या मिळत असून, मीटर रिडिंग, वीज बिलाची माहिती, खंडित वीज पुरवठा अशा अनेक इतर वीज सेवेसंबंधीची माहिती ग्राहकांना थेट मोबाइलवरच एसएमएसद्वारे प्राप्त होत आहे. अकोला परिमंडलातील अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्ह्यातील ३ लाख ३१ हजार ग्राहकांनी मोबाइल क्रमांकाची नोंदणी केली असून, इतर ग्राहकांनीसुद्धा आपला मोबाइल क्रमांक नोंदणी करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणकडे मोबाइल क्रमांक नोंदविलेल्या ग्राहकांना माहिती एसएमएसद्वारे इंग्रजी भाषेत मिळायची, आता वीज ग्राहकांना सोयीनुसार व निवडीनुसार इंग्रजी व मराठी भाषेतही एसएमएस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांचे वीज बिल तयार होताच तत्काळ संबंधित ग्राहकांच्या मोबाइलवर एकूण वीज बिलाची रक्कम, देय तारीख याची माहिती मिळत आहे. मीटरचे रिडिंग घेतल्यानंतर दिनांक व घेतलेले मीटर रिडिंग अशा प्रकारची माहिती वीज ग्राहकांना देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर खंडित वीजपुरवठा, भारनियमन, संबंधित वीज पुरवठा बंद व सुरू होण्याची वेळ याची माहितीदेखील एसएमएसच्या माध्यमातून तातडीने मिळणार आहे. ग्राहकांच्या मीटरचे रिडिंग उपलब्ध न झाल्यास त्याला याचा एसएमएस प्राप्त होणार असून, त्यानंतर ग्राहक दिलेल्या कालावधीत मोबाइल अँपद्वारे मीटरचे रिडिंग महावितरणला थेट पाठवू शकणार आहे, त्यामुळे ग्राहकाला योग्य देयक मिळणार असून, तत्काळ ऑनलाइन भरणा करता येणार आहे. मोबाइल क्रमांक नोंदवलेल्या ग्राहकांना कुठल्याही तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यानंतर वैयक्तिक व इतर माहिती नोंद असल्यामुळे फक्त तक्रार सांगावी लागणार आहे, त्यामुळे तत्पर सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

अशी करा नोंदणी
वीज ग्राहकांनी मोबाइल क्रमांक नोंदविण्यासाठी मोबाइलमध्ये ह्यएम.आर.ई.जी.ह्ण हा शब्द कॅपिटलमध्ये टाइप करून स्पेस देऊन आपला बारा आकडी ग्राहक क्रमांक टाकावा व ९२२५५९२२५५ या क्रमांकावर पाठवून द्यावा. तसेच १८00२३३३४३५/१८00२00३४३५ व १९१२ या टोल फ्री क्रमांकावरही नोंदणी करता येते. महावितरणचे संकेतस्थळ तसेच मोबाइल अँपवरही नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.

सर्व सेवा व सुविधा प्राप्त होण्यासाठी वीज ग्राहकांनी आपला मोबाइल क्रमांक महावितरणच्या प्रणालीमध्ये नोंद करणे अत्यावश्यक आहे. वीज ग्राहकांनी मोबाइल क्रमांक नोंदवावा तसेच मोबाइल अँपचाही वापर वाढवावा.-अरविंद भादीकर, मुख्य अभियंता, अकोला.

Web Title: Power consumers serve mobile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.