ऊर्जा मंत्र्यांचा आज जनता दरबार

By Admin | Published: May 19, 2017 01:33 AM2017-05-19T01:33:32+5:302017-05-19T01:33:32+5:30

थेट संवाद : महावितरणच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण

Power Ministers today's Janata Darbar | ऊर्जा मंत्र्यांचा आज जनता दरबार

ऊर्जा मंत्र्यांचा आज जनता दरबार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवार, १९ मे रोजी अकोला येथे येणार आहेत. जनतेच्या तक्रारी, सूचना व अपेक्षा जाणून घेण्यासाठी ते थेट जनतेशी संवाद साधणार आहेत. तसेच महावितरणच्या पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण व मंजूर कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
शुक्रवार, १९ मे रोजी सकाळी ९ वाजता दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत मंजूर असलेले जिल्ह्यातील अकोली जहागीर, कान्हेरी सरप, कुरुम, माळेगाव बाजार व पिंपरीकड तसेच आयपीडीएस योजनेंतर्गत मंजूर सुधीर कॉलनी व न्यू एमआयडीसी या सर्व ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्रांचा भूमिपूजन सोहळा तसेच अकोट विभागाचे लोकार्पण ऊर्जामंत्री ना. बावनकुळे यांच्या हस्ते अकोला येथील विद्युत भवन येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी ११ ते १ या वेळेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ए.आर. ठाकरे सभागृह अकोला येथे जनतेशी संवाद हा जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ऊर्जामंत्री बावनकुळे हे नागरिक तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्याकडून महावितरण, महापारेषण, राज्य उत्पादन शुल्क या विभागासंबंधीच्या आलेल्या तक्रारी, सूचना व निवेदने यांचे निराकरण करणार आहेत. यावेळी महावितरण, महापारेषण, महाऊर्जा या कंपनीचे कनिष्ठ व वरिष्ठ अधिकारी, विद्युत निरीक्षक तसेच राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षक ते वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.यासोबतच जिल्ह्यातील ऊर्जाविषयक व इतर विविध प्रश्नांवर लोकप्रतिनिधीसोबत बैठक घेणार असून, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासह खासदार, आमदार, जि.प. अध्यक्ष, महापौर, नगराध्यक्ष, पं.स. सभापती व जि.प.चे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Power Ministers today's Janata Darbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.