दुर्गवाडा उपकेंद्रांतर्गत वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:15 AM2021-07-18T04:15:09+5:302021-07-18T04:15:09+5:30
-------------------------- वीजचाेरांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष अकोला: जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, याकडे वीज वितरण कंपनीचे ...
--------------------------
वीजचाेरांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष
अकोला: जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र, वीजचोरीचा भुर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागत आहे.
----------------------
वाडेगाव येथे प्रसाधनगृहाची दुर्दशा
वाडेगाव: स्थानिक बस स्थानक परिसरात असलेल्या प्रसाधनगृहात घाण साचली आहे. भिंतीलाही विद्रूप स्वरूप प्राप्त झाले आहे. मात्र, स्वच्छतेकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. येथे बाजारपेठ मोठी असल्याने ग्रामीण भागातील नागरिक कामानिमित्त येतात.
--------------------
डुकरांचा हैदोस वाढला
तेल्हारा: तालुका मुख्यालयी पाळीव डुकरांचा हैदोस वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
------------------------
कव्हरेजअभावी माेबाइलधारक त्रस्त
पातूर : तालुक्यातील ग्रामीण भागात गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. टाॅवर व भूमिगत केबल लाइनवर लाखाे रुपये खर्च करूनही सेवेत सुधारणा झाली नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.
------------------------
शेतकरी विविध योजनांपासून अनभिज्ञ
बाळापूर: कृषी, महसूल व वनविभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्गम व नक्षलग्रस्त भागांतील गावांमध्ये पोहोचत नसल्याने, या भागातील अनेक शेतकऱ्यांना योजनांची माहिती नाही.
------------------