महावितरणकडून वीज पुरवठा खंडित; नागरिकांमध्ये धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:17 AM2021-03-20T04:17:36+5:302021-03-20T04:17:36+5:30
वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन बिल भरणा न केल्यामुळे परिसरातील १० ते १२ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात ...
वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन बिल भरणा न केल्यामुळे परिसरातील १० ते १२ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. मागील अनेक दिवसांपासून महावितरण कर्मचाऱ्यांचे पथक वीज ग्राहकांच्या घरी जाऊन थकीत बिल भरण्यास सांगत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आर्थिक संकाटात असल्याने वीज बिल कसे भरावे, असा प्रश्न शेतमजूरांना पडला आहे. काही शेतकरी बिल भरण्यास असर्मथ असल्याने ग्राहकाच्या तक्रारी आहेत. थकित वीज बिल भरण्यासाठी काही वेळ देण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे. सस्ती वीज उपकेंद्रचे अभियंता गुहे यांच्या मार्गदर्शनात वीज कर्मचारी एन.आर. ढेंगे, अरूण गायकवाड, विनायक शिंदे, एन.व्ही. पंडित, विशाल वानखेडे, किशोर देशमुख आदी वीज कर्मचारी थकित वीज बिलाची वसुली करीत आहेत.
-----------------------------------------