दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित; ग्रामस्थ त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:35 AM2021-03-13T04:35:01+5:302021-03-13T04:35:01+5:30
पातूर-बाळापूर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. कामासाठी रस्त्यालगतचे झाडे तोडणे सुरू आहे. झाडे तोडल्याने काही फांद्या वीज तारांवर ...
पातूर-बाळापूर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. कामासाठी रस्त्यालगतचे झाडे तोडणे सुरू आहे. झाडे तोडल्याने काही फांद्या वीज तारांवर पडल्याने गुरुवारपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले असून, ग्रामस्थ हैराण झाले आहेत. गावातील प्रभाग क्रमांक १ मधील भौंडेवाडी, शिव चौक, पल्हाडे ले-आउट, गजानन वाडी, शिक्षक कॉलनी आदी भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे मुख्य रस्त्यावरील दिवे बंदच आहेत. त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागला. वीजसमस्या सोडविण्यासाठी सरपंच मंगेश तायडे, उपसरपंच सुनील घाटोळ, सदस्य सुनील धनोकार, अंकुश शहाणे, सुनील मानकर, शेख चांद आदी प्रयत्न करीत असल्याची माहिती सरपंच मंगेश तायडे यांनी दिली.