म्हैसांग येथे वीज पुरवठा सातत्याने खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:19 AM2021-05-21T04:19:32+5:302021-05-21T04:19:32+5:30
वरुर जऊळका परिसरात वादळ वाऱ्यासह पाऊस वरुर जऊळका : वरुर जऊळका व परिसरातील लोतखेड, खापरवाडी ...
वरुर जऊळका परिसरात वादळ वाऱ्यासह पाऊस
वरुर जऊळका : वरुर जऊळका व परिसरातील लोतखेड, खापरवाडी गावांमध्ये १८ मे रोजी सायंकाळी वादळ वाऱ्यासह मुसळधार पाऊस आला. वादळ वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडून गेली. विद्युत खांब वाकल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. अनेक वृक्ष उन्मळून पडले. सुदैवाने गावात जीवितहानी झाली नाही.
दानापूर येथे जंतूनाशक औषध फवारणी
दानापूर : कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने दानापूर येथे जंतूनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. यावेळी उपसरपंच सागर ढगे व गटनेता गोपाल विखे यांनी ग्रामस्थांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश सांगुनवेडे, योगेश येऊल, कपिल घायल, नरहरी हागे, वासुदेव खवले, कर्मचारी अविनाश जामोदकार, अशोक राहाणे, पांडुरंग मानकर, गणेश खडसान, बाळू श्रीनाथ, रामा हागे उपस्थित होते.
फोटो:
पीक विम्यापासून शेतकरी वंचित
कवठा : शासनाकडून पीक विमा व पंतप्रधान सन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा व सन्मान निधी जमा करण्यात आला नाही. खात्यात पैसे जमा करणार असल्याचे शेतकऱ्यांना संदेश आले. परंतु कोणतीही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली नाही. शासनाने निधी खात्यात जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.