कृषी पंपांचा रात्रीचा वीज पुरवठा दोन तासांनी घटविला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:30 AM2017-09-18T01:30:46+5:302017-09-18T01:31:03+5:30
कोळशाच्या कमतरतेमुळे वीज निर्मिती संकटात आल्यामुळे संपूर्ण राज्यात मोठय़ा प्रमाणात भारनियमन करण्यात येत असून, याचा फटका आता कृषी पंपांनाही बसला आहे. कृषी पंपांसाठी पूर्वी दहा तास अखंड मिळणारा वीज पुरवठा आता आठ तासांवर आणण्याचा निर्णय महावि तरणने घेतला आहे. तथापि, विजेच्या उपलब्धतेत सुधारणा होताच पूर्वीप्रमाणे रात्रीच्या वेळी दहा तास वीज पुरवठा करण्यात येईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोळशाच्या कमतरतेमुळे वीज निर्मिती संकटात आल्यामुळे संपूर्ण राज्यात मोठय़ा प्रमाणात भारनियमन करण्यात येत असून, याचा फटका आता कृषी पंपांनाही बसला आहे. कृषी पंपांसाठी पूर्वी दहा तास अखंड मिळणारा वीज पुरवठा आता आठ तासांवर आणण्याचा निर्णय महावि तरणने घेतला आहे. तथापि, विजेच्या उपलब्धतेत सुधारणा होताच पूर्वीप्रमाणे रात्रीच्या वेळी दहा तास वीज पुरवठा करण्यात येईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
वीज निर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धतेत व पुरवठय़ामध्ये अडचणी येत असल्यामुळे राज्यात तात्पुरते भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे विजेची उपलब्धता व मागणी यांचे नियोजन करण्यासाठी कृषी ग्राहकांच्या वीज उपलब्धतेच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
राज्यात कृषी पंपांसाठी ज्या ठिकाणी स्वतंत्र वाहिन्या उभारल्या आहेत व ज्या ठिकाणी सिंगल फेजिंग योजना आहे, अशा वाहिन्यांवर सद्यपरिस्थितीत दिवसा आठ तास व रात्री आठ तास, अशा दोन टप्प्यांमध्ये चक्राकार पद्धतीने रात्री १0 वाजल्यापासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अखंडित वीज पुवठा करण्यात येत आहे. विजेच्या उपलब्धतेत सुधारणा होताच कृषी पंपांना दिवसा आठ तास व रात्री १0 तास वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. विजेची उपलब्धता वाढविण्यासाठी महावितरण सर्व तोपरी प्रयत्न करीत असून, लघू निविदेद्वारे खुल्या बाजारातून वीज खरेदी करण्यात येत आहे. याशिवाय पॉवर ए क्सचेंजमधूनही वीज खरेदीसाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.