कृषिपंपाना लवकरच वीजजाेडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:16 AM2021-01-18T04:16:27+5:302021-01-18T04:16:27+5:30
अकाेला तालुक्यात सर्वाधिक मतदान अकाेला : जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी राेजी झालेल्या मतदानामध्ये सर्वाधिक मतदान हे अकाेला तालुक्यात ...
अकाेला तालुक्यात सर्वाधिक मतदान
अकाेला : जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी राेजी झालेल्या मतदानामध्ये सर्वाधिक मतदान हे अकाेला तालुक्यात झाले आहे. अकाेला तालुक्यात ७२ हजार ४३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, त्या खालाेखाल बाळापुरात ६० हजार ६१, तेल्हाऱ्यात ५५ हजार ६६, अकाेट ५० हजार ९७, बार्शीटाकळी ३३ हजार ७९७, पातूर तालुक्यात ३७ हजार ४६४ मतदान झाले.
ग्रामपंचायत मतमोजणीसाठी पर्यायी मार्गाने वाहतूक
अकोला : ग्रामपंचायत निवडणूक २०२०-२१ची मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शासकीय गोदामामध्ये दि. १८ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेपासून सुरू होणार आहे. मतमोजणीच्या वेळी या ठिकाणी कोणताही अनूचित प्रकार घडू नये याकरिता एचडीएफसी बँक ते सरकारी बगिच्यारोडवरील सर्व प्रकारची वाहतूक वळविण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार सोमवारी सकाळी ७ पासून ते रात्री ८ पर्यंत अशोक वाटिका चौक-मेन हॉस्पिटल-एचडीएफसी चौक-सरकारी बगिच्याकडे जाणारी वाहतूक तसेच येणारी वाहतूक अशोक वाटिका चौक-मेन हॉस्पिटल-बँक चौक-पंचायत समिती चौक-तहसील कार्यालय-बालाजी मॉल-खोलेश्वररोडमार्ग सरकारी बगिच्याकडे या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच लग्जरी स्टँड-सरकारी बगिच्या-बँक चौक-अशोक वाटिका चौक जाणारी व येणारी वाहतूक लग्जरी स्टँड-भगतसिंग चौक-अशोक वाटिका चौक किंवा लग्जरी स्टँड-सरकारी बगिच्या-खोलेश्वररोड-बालाजी मॉल-तहसील कार्यालय-पंचायत समिती कार्यालय-बँक चौक-अशोक वाटिका चौक या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
महाराणा प्रताप चौक-एसपी ऑफिस-बँक चौक-अशोक वाटिका चौककडे जाणारी व येणारी वाहतूक महाराणा प्रताप चौक-रिर्जव माता मंदिर-पंचायत समिती-बँक चौक-अशोक वाटिका चौक या पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.