शंभरच्या वर कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:18 AM2021-03-14T04:18:07+5:302021-03-14T04:18:07+5:30

प्रशांत विखे लोकमत न्यूज नेटवर्क तेल्हारा : थकीत वीजबिलांची वसुली करण्यासाठी महावितरणकडून धडक मोहीम सुरू करण्यात आली होती. या ...

Power supply to over 100 agricultural pumps cut off! | शंभरच्या वर कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित!

शंभरच्या वर कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित!

Next

प्रशांत विखे

लोकमत न्यूज नेटवर्क

तेल्हारा : थकीत वीजबिलांची वसुली करण्यासाठी महावितरणकडून धडक मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत बिलाचा भरणा न करणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात होता. या कारवाईला विरोध झाल्यानंतर स्थगिती देण्यात आली होती; मात्र ही स्थगिती उठविल्यानंतर महावितरणकडून पुन्हा धडक मोहीम सुरू करण्यात आली असून, कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने विजेअभावी पाणी देता येत नसल्याने तालुक्यातील जवळपास शेकडो एकरावरील पिके धोक्यात सापडली आहेत.

विधानसभेत २ मार्च रोजी झालेल्या चर्चेदरम्यान महावितरणच्या थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा तोडण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थगिती दिली होती; मात्र १० मार्च रोजी अधिवेशनाच्या समारोपीय सत्रात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्थगिती उठवून वीजबिलांची वसुली करण्याचे निर्देश दिले. यासंबंधीचा आदेश जिल्हास्तरावर धडकला असून, तालुक्यात महावितरकडून थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई जोरात सुरू आहे.

गतवर्षी चांगला पाऊस बरसल्याने यंदा रब्बी व उन्हाळी पिकांच्या पेरणीत मोठी वाढ झाली आहे. सध्या पिके शेतात बहरली असून, पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. तालुक्यातील कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने विजेअभावी पाणी देणे शक्य नसल्याने जवळपास ५०० च्या वर एकरावरील पिके संकटात सापडली आहेत.

-----------------------------------------

शेतकऱ्यांमध्ये रोष

थकीत वीजबिलांची वसुली महावितरणकडून सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये बिलाचा भरणा न करणाऱ्याचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. शासनाने सुरुवातीला स्थगिती दिली, त्यानंतर काही दिवसांतच स्थगिती उठवल्याने महावितरणकडून कार्यवाहीचा सपाटा सुरू आहे. स्थगिती म्हणजे केवळ अधिवेशनापुरते चॉकलेटच होते, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. पिकांना पाण्याची गरज असतानाच वीज कनेक्शन कट केले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

----------------------

थकीत वीजबिल भरणा करण्याकरिता शासनाची योजना शेतकऱ्यांना समजावून सांगणे सुरू आहे. केवळ सप्टेंबर व डिसेंबर २०२० या महिन्यातील वीजबिलांचा भरणा करण्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. आतापर्यंत १०० ते १२५ वीज कनेक्शन कट करण्यात आले आहेत.

- सचिन कोहळ, उपकार्यकारी अभियंता, तेल्हारा, महावितरण

Web Title: Power supply to over 100 agricultural pumps cut off!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.