थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 07:23 PM2021-01-19T19:23:03+5:302021-01-19T19:26:06+5:30

MSEDCL News थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रिय कार्यालयास आज दिले आहेत.

Power supply of pending customers will be disrupted | थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होणार

थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होणार

googlenewsNext
ठळक मुद्देडिसेंबर २०२० अखेर राज्यात एकूण ६३ हजार ७४० कोटी रुपयांची थकबाकी आहे.जानेवारीपासून मोहिमा राबविण्याचे निर्देश महावितरणने दिले आहेत.

अकोला : वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रिय कार्यालयास आज दिले आहेत.

डिसेंबर २०२० अखेर राज्यात एकूण ६३ हजार ७४० कोटी रुपयांची थकबाकी आहे.कृषिपंप ग्राहकांकडे ४५ हजार ४९८ कोटी, वाणिज्यिक, घरगुती व औदयोगिक ग्राहकांकडे ८४८५ कोटी रुपये व उच्चदाब ग्राहकांकडे २४३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

राज्यात लॉकडाऊनच्या काळात थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित न करण्याचा महावितरणने निर्णय घेतला होता. राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबर अखेरपर्यत खंडित न करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. परंतु आता थकबाकीचा डोंगर वाढल्याने दैनंदिन कामकाज चालविणे महावितरणला शक्य होत नसल्याने, थकबाकी वसूल करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना जानेवारीपासून मोहिमा राबविण्याचे निर्देश महावितरणने दिले आहेत. थकबाकी वसुलीत कसूर करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईचे संकेतही दिले आहेत.

Web Title: Power supply of pending customers will be disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.