वीज चोरीच्या प्रकरणाचा निपटारा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:22 AM2021-09-22T04:22:31+5:302021-09-22T04:22:31+5:30
महावितरणकडून अकोला आणि अकोट येथे वीज चोरीचे खटला पूर्व प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीत तोडजोडीसाठी दाखल केली आहेत. लोक अदालतीत ...
महावितरणकडून अकोला आणि अकोट येथे वीज चोरीचे खटला पूर्व प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीत तोडजोडीसाठी दाखल केली आहेत. लोक अदालतीत सहभाग नोंदवणाऱ्या वीज ग्राहकांना वीज चोरीच्या रकमेवर १० ते १५ टक्के सूट मिळणार आहे. वीज ग्राहकास तडजोड रक्कम पूर्ण भरावी लागेल कारण ही रक्कम शासकीय तिजोरीत जमा होते. वीज चोरीची रक्कम आणि तडजोची रक्कम ही रोखीने भरावी लागणार असून यात वीज ग्राहकास हप्ते पडून मिळणार नाहीत, असेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अकोला शहर, पातूर आणि बार्शी टाकळी येथील प्रकरणे अकोला जिल्हा न्यायालयाच्या परिसरात, हिवरखेड, तेल्हारा आणि अकोट येथील प्रकरणे अकोट येथील न्यायालयाच्या परिसरात सुनावणीसाठी दाखल करण्यात आली आहेत.
वीज चोरी प्रकरणात रकमेवर सूट फक्त लोक न्यायालयात मिळते. ज्या वीज ग्राहकांच्या विरोधात वीज चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जे याचा लाभ घेणार नाहीत त्यांच्या विरोधात पुढील पोलीस कारवाई होऊ शकते.