प्रभावतीबाई नागोराव महल्ले यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:29 AM2021-05-05T04:29:53+5:302021-05-05T04:29:53+5:30
प्रभावतीबाई नागोराव महल्ले अकोला: खेरडा (भागाई) येथील प्रभावतीबाई नागोराव महल्ले यांचे दि. २ मे रोजी निधन झाले. त्यांच्यावर ...
प्रभावतीबाई नागोराव महल्ले
अकोला: खेरडा (भागाई) येथील प्रभावतीबाई नागोराव महल्ले यांचे दि. २ मे रोजी निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे एक मुलगा, चार मुली, सुना, नातवंडे असा बराच आप्त परिवार आहे. प्रतिष्ठित नागरिक संतोष नागोराव महल्ले यांच्या त्या आई होत. (फोटो)
--------------------------------------------------------
अनेक लाभार्थी घरकुलापासून वंचित
बाळापूर: घरकूल लाभार्थी यादी गेल्या दोन-तीन वर्षांपासून मंजूर असून, अतिक्रमण जागेबाबत प्रश्न मार्गी न लागल्याने पात्र असतानाही अनेक लाभार्थी घरकूल लाभापासून वंचितच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन घरकूल लाभार्थींच्या खात्यात अनुदान जमा करण्याची मागणी होत आहे.
------------------------------------------------
‘वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार करा!’
अकोट: उन्हाळा सुरू होताच वनातील पाण्याचे स्रोत आटले आहेत. यामुळे वन्य प्राणी पाण्यासाठी गावाकडे धाव घेत आहेत व शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या पाण्यासाठी पाणवठे तयार करण्याचे आवाहन येथील पक्षीप्रेमी रितेश जॉन यांनी केले आहे.
------------------------------------------
जडवाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी
निंबा फाटा: निंबा फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात जडवाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागांत सर्रास सुरू असून, जडवाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याशिवाय सध्या बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जडवाहतुकीमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
---------------------------------------
व्हायरल फीव्हरमुळे नागरिक हैराण
पांढुर्णा: मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदल व रस्त्याचे काम सुरू असल्याने सगळीकडे धूळ आहे. व्हायरल फीव्हर तसेच सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा त्रास अशा विविध आजारांनी नागरिक हैराण झाले आहेत. रुग्णालये रुग्णांनी हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे.
----------------------------------------------------------------------
ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतित
पातूर: तालुक्यात यंदा मुबलक पाण्याची सुविधा असल्याने बागायती क्षेत्र वाढले आहे. गत तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. बाजार बंद असल्याने टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.