पालकमंत्र्यांच्या हस्ते प्राची जानोरकरचा सत्कार
By Admin | Published: June 30, 2014 01:10 AM2014-06-30T01:10:16+5:302014-06-30T01:53:41+5:30
शालेय शिक्षणमंत्री तथा अकोला जिल्हय़ाचे पालकमंत्री राजेंद्र दर्डा प्राची मधुकर जानोरकर हिचा सत्कार.
अकोला : इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालात राज्यात मुलींमधून दुसरा क्रमांक पटकविणारी शहरातील ज्योती विद्यालयाची विद्यार्थिनी प्राची मधुकर जानोरकर हिचा जिल्हा नियोजन समितीच्या सभेत शालेय शिक्षणमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दहावीच्या परीक्षेच्या निकालात प्राची जानोरकर हिने ९८.८0 टक्के गुण प्राप्त करून राज्यात मुलींमधून ती दुसरी आली आहे.
महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेतही प्राची हिने जिल्हय़ातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, आ.डॉ. रणजित पाटील, आ. गो पीकिशन बाजोरिया, आ. संजय गावंडे, वसंतराव खोटरे, जिल्हाधिकारी अरुण शिंदे व जिल्हा नियोजन समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.