जिल्‍ह्यात लवकरच प्रधानमंत्री कौशल्‍य विकास योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:15 AM2021-01-14T04:15:55+5:302021-01-14T04:15:55+5:30

जिल्ह्यामधील गरजू दिव्‍यांग, अनाथ, शेतकरी आत्‍महत्‍याग्रस्‍त शेतकरी कुटुंबांतील पाल्‍यांना तसेच विधवा, परितक्‍त्‍या स्त्रियांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेमध्‍ये प्रामुख्‍याने ...

Pradhan Mantri Kaushalanya Vikas Yojana in the district soon | जिल्‍ह्यात लवकरच प्रधानमंत्री कौशल्‍य विकास योजना

जिल्‍ह्यात लवकरच प्रधानमंत्री कौशल्‍य विकास योजना

Next

जिल्ह्यामधील गरजू दिव्‍यांग, अनाथ, शेतकरी आत्‍महत्‍याग्रस्‍त शेतकरी कुटुंबांतील पाल्‍यांना तसेच विधवा, परितक्‍त्‍या स्त्रियांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेमध्‍ये प्रामुख्‍याने प्राधान्‍य देऊन गरजू व पात्र उमेदवारांनी या योजनेचा जास्‍तीत जास्‍त लाभ घ्‍यावा, असे निर्देश जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष कौशल्‍य विकास कार्यकारी समिती अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी दिले आतापर्यत केंद्र सरकार पुरस्‍कृत असलेल्‍या या योजनेची अंमलबजावणी आता राज्‍य सरकारद्वारे जिल्‍हा स्‍तरावरून होणार आहे सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करिता जिल्‍हाधिकारी यांचे अध्‍यक्षतेखाली जिल्‍हा कौशल्‍य विकास कार्यकारी समितीची सभा जिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडली. यावेळी जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर, जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रकाश जयस्‍वाल, जिल्‍हा नियोजन अधिकारी गिरीश शास्‍त्री, शासकीय औघोगिक प्रशिक्षण संस्‍था (मुलींची) चे प्राचार्य राम मुळे, महानगरपालिकेचे शहरी प्रकल्प अधिकारी गणेश बिल्‍लेवार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रशासन अधिकारी डॉ. किशोर बिडवे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ श्रीमती अर्चना बारब्‍दे, तसेच कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सुधाकर झळके, उपस्थित होते.

या योजनेबाबत अधिक माहितीकरिता जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत २ रा माळा अकोला या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

Web Title: Pradhan Mantri Kaushalanya Vikas Yojana in the district soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.