प्रहारच्या कार्यकर्त्यांनी तेल्हारा पंचायत समितीच्या ‘बीडीओं’ना फासले काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 06:29 PM2018-12-19T18:29:28+5:302018-12-19T18:29:54+5:30
अकोला : तेल्हारा पंचायत समितीच्या कार्यालयात विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आलेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकारी राजीव फडके यांच्यावर ...
अकोला : तेल्हारा पंचायत समितीच्या कार्यालयात विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आलेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकारी राजीव फडके यांच्यावर काळ्या रंगाची शाई टाकल्याचा प्रकार बुधवारी दुपारी घडला. राजीव फडके यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तालुक्यातील अनेक गावातील घरकुल आणि अपंग लाभार्थ्यांचे प्रश्न पंचायत समितीस्तरावर प्रलंबीत आहेत. गोरगरीब लाभार्थ्यांच्या मागण्या न सोडविता अधिकाऱ्यांकडून केवळ टोलवा-टोलवी होत असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या देत लाभार्थ्यांचे प्रश्न निकाली काढण्याची मागणी रेटून धरली. मात्र, अधिकाऱ्यांकडून उडवा-उडवीचे उत्तरे मिळत असल्याने संप्तत झालेले जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून तीव्र आंदोलन केले.