वीज बिल माफीचा कंपनीचा प्रस्ताव एका मंत्र्यानं दाबून ठेवला; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

By मोरेश्वर येरम | Published: November 20, 2020 06:26 PM2020-11-20T18:26:28+5:302020-11-20T18:33:35+5:30

वीज वापरली असेल तर त्याचं बिल भरावच लागेल, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या या विधानानंतर सर्व विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.

prakash ambedkar allegations on state government minister over electricity bill issue | वीज बिल माफीचा कंपनीचा प्रस्ताव एका मंत्र्यानं दाबून ठेवला; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

वीज बिल माफीचा कंपनीचा प्रस्ताव एका मंत्र्यानं दाबून ठेवला; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

googlenewsNext
ठळक मुद्देवीज कापल्यास वीज जोडणीची जबाबदारी घेणार वंचितवीज बिल माफीचा प्रस्ताव एका मंत्र्यानं दाबून ठेवल्याचा आरोपराज्याचा कारभार मुख्यमंत्री चालवतायत की मंत्री? आंबेडकरांचा सवाल

अकोला
राज्यात ५० टक्के वीज बिल माफ होऊ शकते असा प्रस्ताव वीज कंपन्यांनी दिला होता, पण हा प्रस्ताव राज्याच्या एका मंत्र्याने दाबून ठेवला, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 

वीज बिल माफीच्या मुद्यावरुन राज्यात चांगलंच राजकारण तापलं आहे. वीज वापरली असेल तर त्याचं बिल भरावच लागेल, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या या विधानानंतर सर्व विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. वीज बिलात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्याने रद्द केला? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी याआधी नांदेड येथील पत्रकार परिषेदत उपस्थित केला होता. यासोबतच राज्यातील जनतेला वीज बिल न भरण्याचं आवाहनही त्यांनी केलं होतं. 

अकोला येथे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. राज्याचा कारभार मुख्यमंत्री चालवत आहेत की  एखादा मंत्री? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

वीज कापल्यास वीज जोडणीची जबाबदारी घेणार वंचित
वीज बिल माफ केलं नाही, तर कुणीही वीज बिल भरू नये. ज्यांची वीज कापली जाईल त्यांची वीज जोडून देण्याची जबाबदारी वंचित घेईल, अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली आहे. 

मनसेही आक्रमक
वाढीव वीज बिल भरलं नाही म्हणून वीज कापण्यास कुणी आलं तर त्यांना मनसे स्टाइल शॉक देऊ असा इशाराच मनसेनेच्या नेत्यांनी दिला आहे. वीज बिलाच्या मुद्द्यावरुन येत्या काळात मनसेकडून मोठं आंदोलन केलं जाण्याची शक्यता आहे. ठाणे-पालघर जिल्ह्यात जनतेकडून बळजबरीनं वीज बिल घेतलं जाणार अशेल तर तुमची गाठ मनसेशी आहे हे लक्षात ठेवा, अशा इशाराच मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. 

Web Title: prakash ambedkar allegations on state government minister over electricity bill issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.