विभागीय आयुक्तांपुढे आज प्रकाश आंबेडकर करणार युक्तिवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 01:09 AM2017-08-23T01:09:33+5:302017-08-23T01:10:35+5:30

अकोला: अकोला महापालिकेतील अतिरिक्त करवाढप्रकरणी  भारिप-बहुजन महासंघाचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर बुधवारी  अमरावती आयुक्तांपुढे असलेल्या सुनावणीत युक्तिवाद करणार  आहेत. अकोलेकरांवर लादलेल्या अतिरिक्त करवाढीला त्यांनी  सुरुवातीपासून विरोध दर्शविला असून, त्याचा पुढचा टप्पा आता ते  युक्तिवाद करणार आहेत.

Prakash Ambedkar will argue before the departmental commissioner today | विभागीय आयुक्तांपुढे आज प्रकाश आंबेडकर करणार युक्तिवाद

विभागीय आयुक्तांपुढे आज प्रकाश आंबेडकर करणार युक्तिवाद

Next
ठळक मुद्देमहापालिकेतील करवाढीचा विषय भारिप-बमसंचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोला महापालिकेतील अतिरिक्त करवाढप्रकरणी  भारिप-बहुजन महासंघाचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर बुधवारी  अमरावती आयुक्तांपुढे असलेल्या सुनावणीत युक्तिवाद करणार  आहेत. अकोलेकरांवर लादलेल्या अतिरिक्त करवाढीला त्यांनी  सुरुवातीपासून विरोध दर्शविला असून, त्याचा पुढचा टप्पा आता ते  युक्तिवाद करणार आहेत.
भाजपा प्रणीत सत्तेतील अकोला महापालिकेने मालमत्ता करात  अव्वाची सव्वा वाढ केली. त्यास भारिप-बमसंतर्फे  सर्वप्रथम १ मे  रोजी विरोध दर्शविला गेला. त्यानंतर १९ मे रोजी अँड. धनश्री  अभ्यंकर यांच्या नेतृत्वात जठारपेठ परिसर बंद ठेवला गेला. भारि प-बमसंचे राष्ट्रीय नेते अँड. प्रकाश आंबेडकरांनी याला विरोध  दर्शविण्यासाठी २८ जून रोजी महापालिका कार्यालयात येऊन स्व त: कराचा भरणा केला. त्यानंतरही काही एक परिणाम न झाल्याने  १८ ऑगस्टला पदाधिकार्‍यांच्या निवासस्थानी घेराव घातला गेला.  त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी महापालिकेच्या आमसभेत विरोध  दर्शविला गेला. दरम्यान, नगरसेविका अँड. धनश्री अभ्यंकर  यांच्या नेतृत्वात दहा जणांची एक समिती गठित करून त्यांनी  अमरावतीचे विभागीय आयुक्त यांच्याकडे दाद मागितली. त्यात  अभ्यंकरसह महादेव जगताप, किरण बोराखडे, हरिदास भदे,  गजानन गवई, मनोहर पंजवाणी, आशीष तिवारी, डॉ. राजकुमार  रंगारी, अँड. संतोष रहाटे आणि बालमुकुंद भिरड यांचा समावेश  आहे. दहा जणांनी फिर्याद नोंदविलेल्या या याचिकेवरील सुनावणी  आता बुधवार २३ ऑगस्ट रोजी होत आहे. या सुनावणीच्या वेळी  अँड. प्रकाश आंबेडकर प्रामुख्याने उपस्थित राहून युक्तिवाद  करणार आहेत. आता अमरावती आयुक्त याप्रकरणी तारीख देतात  की, सुनावणीसाठी प्रकरण ठेवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून  आहेत.

Web Title: Prakash Ambedkar will argue before the departmental commissioner today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.