प्रमोद महल्ले यांनी पदभार स्वीकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:17 AM2021-03-07T04:17:26+5:302021-03-07T04:17:26+5:30

देऊळगाव येथे रक्तदान शिबिर अकोट: संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त अकोट तालुक्यातील देऊळगाव येथे आयोजित रक्तदान शिबिरात ४० जणांनी ...

Pramod Mahalle took over | प्रमोद महल्ले यांनी पदभार स्वीकारला

प्रमोद महल्ले यांनी पदभार स्वीकारला

Next

देऊळगाव येथे रक्तदान शिबिर

अकोट: संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त अकोट तालुक्यातील देऊळगाव येथे आयोजित रक्तदान शिबिरात ४० जणांनी रक्तदान केले. यावेळी देऊळगावचे सरपंच अविनाश गावंडे उपस्थित होते. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोना लसीकरणास ज्येष्ठांचा प्रतिसाद

मूर्तिजापूर: येथील उपजिल्हा रुग्णालयात १ मार्चपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. लसीकरण मोहिमेला ज्येष्ठ नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. आतापर्यंत १ हजार ५७८ ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना लस घेतल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय सोनोने, डॉ. राजेंद्र नेमाडे, डॉ. वाडेकर यांनी दिली.

देशी दारूचा साठा जप्त

बार्शीटाकळी: दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी बार्शीटाकळीतील इंदिरा आवास परिसरात छापा घालून अशोक पांडुरंग वऱ्हाळे, प्रवेश झिंगाजी गोपनारायण यांच्याकडून देशी दारूच्या २१८ बाटल्या जप्त केल्या. त्यांच्याविरुद्ध बार्शीटाकळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

कोरोना चाचणीकडे नागरिकांकडे पाठ

अडगाव: अडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत १३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. प्रशासनाने गावामध्ये कोरोना तपासणी शिबिर आयोजित केले होते. परंतु शिबिराकडे नागरिकांनी पाठ फिरविली. फिरते पथकसुद्धा प्रतिसाद न मिळाल्याने, माघारी परतले.

चोहोट्टा बाजार येथे देशी दारूचा साठा जप्त

चोहोट्टा बाजार: चोहोट्टा बाजार पोलिसांनी देशी दारू अवैध अड्ड्यावर शुक्रवारी छापा घालून आरोपी मुकुंदा सुभाष रायबोले (२७ रा. आडसूळ) याच्याकडून ६ हजार रुपयांचा दारू साठा जप्त केला. ही कारवाई दहीहांडाचे ठाणेदार महेश गावंडे, अयन घोरमाडे, नीलेश गावंडे यांनी केली.

तळेगाव बाजार येथील यात्रा उत्सव बंद

तळेगाव बाजार: तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथे दरवर्षी होणारा महाशिवरात्री यात्रा उत्सव यावर्षी कोरोनामुळे बंद करण्यात आला. सोमेश्वर मंदिरात पारायण व ११ मार्चला उत्सव, १२ मार्चला होणारा यात्रा उत्सव यंदा होणार नाही. असे विश्वस्त मंडळाने कळविले.

वाडेगाव मोफत लसीकरणास सुरुवात

वाडेगाव: प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत वाडेगाव व परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना व ४५ वर्षीय दुर्धर आजारी नागरिकांना कोविड १ मोबाईल ॲपवर नोंदणी करून मोफत लसीकरण सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन डॉ. भावना हाडोळे यांनी केले.

देगाव रस्त्यावर कार-दुचाकीचा अपघात

देगाव: देगाव-वाडेगाव रोडवर बोलेरो कार व दुचाकीचा अपघाताची घटना शुक्रवारी दुपारी घडली. देगाव येथील राजेश चहाकर दुचाकीने वाडेगाववरून परत येत असताना, त्यांच्या दुचाकीला बोलेरो वाहनाने धडक दिली. यात ते किरकोळ जखमी झाले असून, दुचाकीचे नुकसान झाले.

कोरोनामुळे आठवडी बाजार बंद

माळेगाव बाजार: तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथे कोरोनामुळे आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बसथांब्याजवळ काही विक्रेत्यांनी भाजी बाजार भरवला होता. परंतु पोलिसांनी या ठिकाणी येऊन बाजार बंद करण्यास विक्रेत्यांना बजावले. काही दिवस येथील बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.

धोंडा आखर येथे ८ जण पॉझिटिव्ह

खंडाळा: अडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येणाऱ्या धोंडा आखर येथील कोरोना तपासणी शिबिरात तपासणी केल्यावर ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. आरोग्य विभागाच्या फिरत्या पथकाकडून नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.

चिखलगावात नागरिक बेफिकीर

चिखलगाव: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही गावात काही नागरिक बेफिकीर होत वावरताना दिसत आहेत. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर कोणीच करताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

प्रकटदिनी मंदिरांमध्ये शुकशुकाट

पिंजर: संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो. यानिमित्त ठिकठिकाणी महाप्रसाद आयोजित करण्यात येतो. परंतु यंदा कोरोनामुळे मंदिरे बंद होती. भाविकांनी मंदिराबाहेरूनच दर्शन घेतले. परिसरात इतर मंदिरांमध्ये भाविकांची वर्दळ दिसून आली नाही.

गावातील अतिक्रमण हटविण्याची मागणी

पारस: गावातील प्रमुख रस्त्यावर विक्रेत्यांनी टपऱ्या थाटून अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणामुळे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. पारस ग्रामपंचायतने याकडे लक्ष देऊन गावातील रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

बोरगावात मास्कची मागणी वाढली

बोरगाव मंजू: कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. दररोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. प्रशासनाकडूनसुद्धा सातत्याने जनजागृती करण्यात येत असल्याने, गावामध्ये मास्कची मागणी वाढली असून, विक्रेत्यांनीसुद्धा विविध प्रकारचे मास्क उपलब्ध केले आहेत.

Web Title: Pramod Mahalle took over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.