प्रींटिंग प्रेस संचालकाचे बयाण नोंदविले!

By admin | Published: January 5, 2016 01:59 AM2016-01-05T01:59:04+5:302016-01-05T01:59:04+5:30

किडनी तस्करी प्रकरणामध्ये बनावट दस्तऐवज तयार करणार्‍या प्रींटिंग प्रेसच्या संचालकास खदान पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेऊन त्याचे बयाण नोंदविले.

Pranting Press Director's Record Reported! | प्रींटिंग प्रेस संचालकाचे बयाण नोंदविले!

प्रींटिंग प्रेस संचालकाचे बयाण नोंदविले!

Next

अकोला - किडनी तस्करी प्रकरणामध्ये बनावट दस्तऐवज तयार करणार्‍या प्रींटिंग प्रेसच्या संचालकास खदान पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेऊन त्याचे बयाण नोंदविले. प्रमोद शेजव असे प्रींटिंग प्रेस संचालकाचे नाव असून, त्याने बनावट दस्तऐवज तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा संशय पोलिसांना आहे.
किडनी तस्करी प्रकरणामधील पीडित अमर शिरसाट व किडनी खरेदी करणारा जुने शहरातील रहिवासी संतोष कोल्हटकर, संतोष गवळी व शांताबाई खरात यांची किडनी काढून त्यांना मोबदल्यात तुटपुंजी रक्कम देऊन फसवणूक करण्यात आली होती. या फसवणुकीची तक्रार तिघांनीही पोलीस ठाण्यात केल्यानंतर तसेच ह्यलोकमतह्णने या प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने किडनी तस्करांच्या मोठय़ा रॅकेटचा पर्दाफाश झाला. या प्रकरणाचा सूत्रधार शिवाजी कोळी, देवेंद्र शिरसाट, आनंद जाधव, विनोद पवार यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर किडनी तस्करी प्रकरणामध्ये प्रत्येक स्तरावर वापरण्यात आलेले दस्तऐवज हे बनावट असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यामधील काही बनावट दस्तऐवज हरिहरपेठेतील प्रमोद प्रींटिंग प्रेसमध्ये बनविण्यात आल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी या प्रकरणी महेंद्र तायडे याला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आता सोमवारी प्रमोद शेजव याला ताब्यात घेऊन त्याचे बयाण नोंदविण्यात आले आहे. प्रमोद शेजव याच्या बयाणानंतर पोलीस सखोल तपास करून पुढील कारवाई करणार आहेत. किडनी तस्करीमध्ये ओळखपत्र बनावट तयार करणे, समितीचे दस्तऐवजही बनावट तयार क ेल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

Web Title: Pranting Press Director's Record Reported!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.