पावसासाठी वरुणराजाला साकडे; धोंडीनंतर झाला भंडारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 05:31 PM2019-07-17T17:31:46+5:302019-07-17T17:32:27+5:30
अकोला: वरूणराजाला साकडे घालण्यासाठी मोठी उमरीतील अयोध्यानगरातील युवकांनी रविवारी 'धोंडी-धोंडी पाणी दे, साय माय पिकू दे'च्या गजरात धोंडीची गावातून मिरवणूक काढली.
अकोला: वरूणराजाला साकडे घालण्यासाठी मोठी उमरीतील अयोध्यानगरातील युवकांनी रविवारी 'धोंडी-धोंडी पाणी दे, साय माय पिकू दे'च्या गजरात धोंडीची गावातून मिरवणूक काढली. मिरवणुकीत युवक आबालवृद्धांनी सहभाग घेतला होता. यावेळी महिलांनी धोंडीवर पाणी टाकले. धोंडी-धोंडीने तरी पाणी पडेल अशी पूर्वीपासूनची प्रथा आहे. त्यामुळे ग्रामीण भागात वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी धोंडी-धोंडी काढून साकडे घातले जाते. त्यानुसार युवकांनी 'धोंडी-धोंडी पाणी दे, साय-माय पिकू दे' असे म्हणत पाऊस पाडण्यासाठी वरुणराजाला साकडे घातले. मृग नक्षत्र कोरडेच गेले. त्यानंतर आर्द्रातही पाऊस नसल्याने शेतकरीराजा चिंतातूर झाला आहे. सर्वांचेच डोळे पावसाकडे लागल्याने वरूण राजाला विनवणी करण्यासाठी धोंडी मागण्याच्या प्रथेचा आधार उमरीतील अयोध्या नगर येथील युवकांनी घेतला आणि दुपारी लहान मुलांनी कमरेला कडुलिंबाची पाने गुंडाळून धोंडी बनवली धोंडीची खांद्यावरून मिरवणूक काढली. मिरवणुकीत दाळ ज्वारीची धोंडी मागून नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अशोक थारकर, रामेश्वर चांदणे, राजेश चंदन, रमेश गवळी, राजेश डोंजेकर, अनिल पाचपोर, निखिल थारकर, सुरेश कट्यारमल, विलास बाळापूरे, अक्षय गवळी, रत्ना गवळी, सुनीता डोंजेकर, उज्वला थारकर, चंद्रभागा चिंचोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.