आधीच उकाडा; त्यात आकस्मिक भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 07:28 PM2017-09-10T19:28:08+5:302017-09-10T19:28:43+5:30

Pre-heat; Contingency load regulation in it | आधीच उकाडा; त्यात आकस्मिक भारनियमन

आधीच उकाडा; त्यात आकस्मिक भारनियमन

Next
ठळक मुद्देविजेचा तुटवडा घामधारांनी नागरिक हैराण

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विजेची वाढलेली मागणी व पुरवठा यांचा  ताळमेळ बसविताना महावितरणला चांगलीच कसरत  करावी लागत असून, गत दोन दिवसांपासून जिल्हय़ात  शहर व ग्रामीण भागात आकस्मिक भारनियमन करण्या त येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रविवारीही  आकस्मिक भारनियमन करण्यात आले. सायंकाळी  पाच वाजेपर्यंत सर्वच भागातील भारनियमन मागे घेण्या त आले. 
 वीज देयकांची वसुली व वीज गळतीच्या प्रमाणाचा  अभ्यास करून जिल्हय़ाची ग्रुपनिहाय विभागणी केली  आहे. विजेचा तुटवडा निर्माण झाल्यास ‘ए’, ‘बी’,  ‘सी’, ‘डी’, ‘ई’, ‘एफ’, ‘जी १’, ‘जी २’ व ‘जी ३’  या ग्रुपवर आकस्मिक भारनियमन केले जाते. गत दोन  दिवसांपासून विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने महावि तरणच्यावतीने जिल्हय़ातील ई, एफ, जी १, जी २ व  जी ३ या ग्रुपवर आकस्मिक भारनियमन केल्या जात  आहे. रविवारीही जिल्हय़ातील विविध फिडरवर  त्यांच्या ठरावीक वेळापत्रकानुसार भारनियमन करण्यात  आले. सकाळी व सायंकाळी दोन टप्प्यात सात तासां पर्यंत भारनियमन केले जात असल्याने नागरिकांना  प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गत काही  दिवसांपासून वातावरणात कमालीचा उकाडा वाढला  आहे. घामधारांनी नागरिक आधीच त्रस्त असताना  विजेच्या भारनियमनाने त्यात भरच पडली आहे.  पाणीटंचाईच्या काळात वीज पुरवठय़ाअभावी पाणी  मिळत नसल्याने नागरिकांच्या गैरसोयीत वाढच झाली  आहे. बाजारपेठांमध्ये वीज पुरवठा खंडित राहत  असल्याने त्याचा परिणाम अनेक व्यवसायांवरही होत  आहे. 

Web Title: Pre-heat; Contingency load regulation in it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.