अकोटात मान्सूनपूर्व सफाई मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:14 AM2021-05-03T04:14:13+5:302021-05-03T04:14:13+5:30
यामध्ये प्रभाग क्र. ८ मधील न.प. उपाध्यक्ष अब्ररार खा यांच्या घरापासून ते उमरा रस्त्याकडे जाणारे मोठ्या नाल्याची साफसफाई करण्यात ...
यामध्ये प्रभाग क्र. ८ मधील न.प. उपाध्यक्ष अब्ररार खा यांच्या घरापासून ते उमरा रस्त्याकडे जाणारे मोठ्या नाल्याची साफसफाई करण्यात आली आहे. ही मोहीम मुख्यधिकारी श्रीकृष्ण वहूरवाघ यांच्या आदेशानुसार आरोग्य निरीक्षक चंदन चंडालीया राबवित आहेत.
........
रौदळा येथे रक्तदान शिबीर
अकोटः तालुक्यातील रौंदळा येथील नवयुवक मंडळामार्फत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिराला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमात सुरुवातीला संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन संतोष दिवणाले व किशोर सरोदे यांनी केले. यावेळी आशिष वानखडे,दीपक सिरसाट,विक्रम डिक्कर, गोपाल देशमुख, शुभम गाडेकर, अक्षय दारोकार, ऋषिकेश मार्के, निलेश कुकडे, रोहित गाडेकर, निलेश निर्मळ, आकाश सरोदे, स्वप्निल मोकळकार, कपिल राऊत, रामा काळे, सतीश डिक्कर, रतन अबगड,गणेश होळकर, विनय सरोदे, संकेत डिक्कर, गणेश तायडे, गोपाल गाडेकर,गणेश खोटरे, रवि ढगे, जयवंत डिक्कर, प्रवीण ढेंगे,प्रतीक रोकडे, उमेश बोदळे, गोपाल आमले आदींनी रक्तदान केले. यशस्वितेसाठी संदीप वानखडे, अंकुश ढगे, विश्वास डिक्कर, सुनील कोरडे, गजानन कोरडे, दिनेश चितोडे यांनी परिश्रम घेतले.
------------------------------
नागरी आरोग्य केंद्राना निधीची मागणी
अकोटः अकोट शहरातील नंदीपेठ, गोलबाजार नागरी केंद्र हे कोविड-१९ च्या काळात वैद्यकीय मदतीचे केंद्र ठरत आहे. नागरी आरोग्य केंद्रांना निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे शिवसेना माजी उपशहर प्रमुख विजय ढेपे यांनी केली आहे.