जिल्ह्यात मान्सूनपूर्व कपाशीचा पेरा घटला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:19 AM2021-05-21T04:19:50+5:302021-05-21T04:19:50+5:30
मागील वर्षी कपाशीचे बियाणे मे महिन्याच्या शेवटी उपलब्ध करून दिले होते. जेणेकरून कपाशीची मान्सूनपूर्व लागवड शेतकरी करणार नाहीत. कपाशी ...
मागील वर्षी कपाशीचे बियाणे मे महिन्याच्या शेवटी उपलब्ध करून दिले होते. जेणेकरून कपाशीची मान्सूनपूर्व लागवड शेतकरी करणार नाहीत. कपाशी पिकावर येणाऱ्या गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
मान्सूनपूर्व कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव जास्त राहतो. मागील वर्षी नोव्हेंबरपर्यंत सततच्या पावसामुळे कपाशीचा सुरुवातीचा कापूस खराब झाला. नंतरचा कापूस राखण्यात शेतकऱ्यांना यश मिळाले; पण हंगाम मार्च, एप्रिलपर्यंत लांबला आहे. या लांबलेल्या पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव पण जवळपास ५० ते ५५ टक्के नोंदविला गेला आहे. याकरिता यंदाही कृषी विभागाने १ जूनपर्यंत कपाशीच्या विक्रीसाठी प्रतिबंध लावले आहेत. या मागील वर्षी बोंडअळीचा अनुभव घेता जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली नसल्याचे चित्र आहे.
--बॉक्स--
उत्पादनात ५० टक्के घट
जिल्ह्यात मागील खरिपात कापूस उत्पादक क्षेत्राला गुलाबी बोंडअळीचा फटका बसला आहे. कापूस क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली.
--बाॅक्स--
मान्सूनपूर्व पेरणीच्या हालचाली!
जिल्ह्यात असलेल्या एक लाख ५२ हजार हेक्टरपैकी किमान १० टक्क्यांपर्यंत कपाशीची पूर्वमोसमी लागवड होत असते. मागील वर्षी बोंडअळीमुळे झालेले नुकसान व उत्पादनात घट यामुळे त्रस्त झाले. प्रतिबंध असताना काही गावांमध्ये मान्सूनपूर्व कपाशी लागवडीच्या हालचाली सुरू आहेत.
--बॉक्स--
मागील वर्षी कपाशी लागवड
१ लाख ४५ हजार हेक्टर
यंदा कपाशी लागवड नियोजन
१ लाख ४७ हजार हेक्टर