मान्सूनपूर्व कापूस पेरणीच्या हालचाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 05:00 PM2020-04-28T17:00:21+5:302020-04-28T17:00:40+5:30

सध्या मान्सूनपूर्व कपाशी लागवडीच्या हालचाली सुरू आहेत

Pre-monsoon cotton sowing movement! | मान्सूनपूर्व कापूस पेरणीच्या हालचाली!

मान्सूनपूर्व कापूस पेरणीच्या हालचाली!

Next

अकोला: यावर्षी खरीप हंगामात कापसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असून, सध्या मान्सूनपूर्व कपाशी लागवडीच्या हालचाली सुरू आहेत. याच अनुषंगाने पेरणी, बियाणे खरेदी आदींची शास्त्रीय माहिती कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना आॅडिओ क्लिप द्वारे देत आहेत.
मागील वर्षी महाराष्ट्र शासनाने कपाशीचे बियाणे मे महिन्याच्या शेवटी उपलब्ध करून दिले होते जेणे करुन कपाशीची मान्सून पूर्व लागवड शेतकरी करणार नाहीत. कपाशी पिकावर येणाºया गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. क
मान्सून पूर्व कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव जास्त राहतो. मागील वर्षी नोव्हेंबर पर्यंत सततच्या पावसामुळे कपाशीचा सुरवातीचा कापूस खराब झाला. नंतरचा कापूस राखण्यात शेतकºयांना यश मिळाले पण हंगाम मार्च एप्रिल पर्यंत लांबला आहे. या लांबलेल्या पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव पण जवळपास ५० ते ५५ टक्के नोंदविला गेला आहे. दरम्यान,कोरोनामुळे मागील दीड महिन्यापासून सर्वच व्यवहार, माल वाहतूक जवळपास थांबल्या सारखी आहे. परंतू येणाºया हंगामात शेतकºयांना बियाणे, खते वेळेवर उपलब्ध व्हावेत, खरेदी करतांना गर्दी होवू नये याकरिता शासनाने १ मे पासून कृषी निविष्ठा विक्रीस मान्यता देण्यात आली आहे. या हंगामामध्ये सुरवातीच्या १ महिन्यामध्ये आपल्याला लागणाºया निविष्ठा ची यादी तयार करावी लागणार असून,कपाशीचे वाण, विविध खते, कीटकनाशकाचा यात समावेश करावा,सध्या खेडे गावामध्ये शेतीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. कारोनामुळे कुठे जाणे येणे नाही आहे. त्यामुळे शेतकºयांजवळ सध्या फावला वेळ आहे. शेतकºयांनी सद्या या टाळे बंदीच्या काळात निंबोळ्या गोळा केल्यास निबोळ्यापासून पुढे हंगामामध्ये निंबोळी अर्क तयार करून रस शोषक किडींचे व बोंड अळ्यांचे कमी खर्चात व्यवस्थापन करता येईल. वनस्पतीजन्य कीटकनाशकांच्या वापरामुळे मित्र किडींच संवर्धन पण होईल.अशी माहिती आणि सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ.प्रशांत नेमाडे यांनी दिला.

Web Title: Pre-monsoon cotton sowing movement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.