मान्सूनपूर्व वीज यंत्रणेची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:18 AM2021-05-23T04:18:30+5:302021-05-23T04:18:30+5:30
अकोला : मान्सून काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे महावितरण अकोला परिमंडळाने मान्सूनपूर्व वीज यंत्रणा देखभाल व दुरुस्तीच्या कामात ...
अकोला : मान्सून काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे महावितरण अकोला परिमंडळाने मान्सूनपूर्व वीज यंत्रणा देखभाल व दुरुस्तीच्या कामात गती आणली असून, अनेक महत्त्वपूर्ण कामे पार पाडली आहेत.
वादळाने टपऱ्यांचे नुकसान
अकोला : दोन दिवसांआधी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शहरातील रस्त्यांच्या कडेला असलेल्या टपऱ्यांचे नुकसान झाले आहे. व्यवसाय बंद असल्याने आधीच बेरोजगारीची कुऱ्हाड या टपरीधारकांवर आली आहे. त्यात हे नुकसानीने आणखी भर टाकली आहे.
जनजागृतीचा अभाव
अकोला : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुका स्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे. यासाठी स्वतंत्र निधीची गरज आहे.
कुलींवर उपासमारीची वेळ
अकोला : कोरोनामुळे प्रवासी आपले साहित्य कुलींना देणे टाळत आहेत. अशास्थितीत कुलींना काम मिळत नसून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनामुळे प्रवासी प्रवास करणे टाळत आहेत. प्रवाशांचा कमी प्रतिसाद असल्यामुळे रेल्वेगाड्याही रद्द करण्यात येत आहेत.
अनियमित वीज पुरवठा
अकोला : शहरात अनियमित वीज पुरवठा होत आहे. सोबतच वारंवार वीज गुल होते. वाऱ्याची झुळूक आली असता पुरवठा खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो.