जलसंधारणासाठी टाळले लग्नाचे मुहूर्त!

By Admin | Published: March 17, 2017 03:07 AM2017-03-17T03:07:35+5:302017-03-17T03:07:35+5:30

खैरखेड ग्रामसभेत निर्णय : २२ मेपर्यंत लग्न नाही!

Pregnancy for water conservation! | जलसंधारणासाठी टाळले लग्नाचे मुहूर्त!

जलसंधारणासाठी टाळले लग्नाचे मुहूर्त!

googlenewsNext

अकोट, दि. १६- सातपुड्याच्या पायथ्याशी असणारे खैरखेड विद्रूपा नदीने ग्रासले आहे. तेथील जमीन मुरमाड, पाण्याची पातळी अतिशय खोलवर, पांथस्थाला वाळवंटात तहान लागावी असा भाग आहे. अशा परिस्थितीत ग्रामवासीयांनी पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप - २ ह्या स्पर्धेत सहभाग घेतला. ग्रामसभेतून पाच व्यक्तींची नावे प्रशिक्षणासाठी घोषित केली गेली. १६ ते १९ फेब्रुवारी २0१७ या कालावधीत प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामसभेत एकमुखी निर्णय घेऊन जलसंधारण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एवढेच नव्हे तर ग्रामस्थांनी २२ मे पर्यंत लग्नाचे मुहूर्तही टाळले. पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणाने प्रशिक्षणार्थी अगदी भारावून गेले. गावाकडे परतल्यानंतर गावामध्ये त्यांनी समरस विचारधारा निर्माण केली व गावामध्ये जल चळवळ सुरू झाली. प्रशिक्षणाने जलसंवर्धनाबरोबरच लोकांचे मन परिवर्तनाचेदेखील काम केले. २ मार्चला झालेल्या ग्रामसभेत लोकांनी ८ एप्रिल ते २२ मे या स्पर्धेच्या कालावधीत गावात कोणीही लग्नाचे मुहूर्त काढणार नाही, असा एकमुखी निर्णय घेण्यात आला. वधू-वरांनी बोहल्यावर चढण्याआधी जल-संधारणाला महत्त्व देण्याचे ठरवले. गावाला पाणीदार करण्याचे व्रत समस्त ग्रामवासीयांनी घेतले. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक केशवराव मेतकर, सरपंच मारोती हुमने, पाणी फाउंडेशनचे तालुका-समन्वयक नरेंद्र काकड, मनीष महाले, योगेश शिंगोडे, देवेंद्र बन्सोड, शारदा किसन भटकर, रुखमा फुलके, सुनित खंडेराव, अनंत मेतकर, धीरज बोंद्रे, मंगला इंगळे, नीलिमा मेश्राम, विशाल गणवीर, प्रतीक भिवगडे, प्रवीण निकुरने आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Pregnancy for water conservation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.