गरोदर महिलांनाही घेता येणार लस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:23 AM2021-07-07T04:23:10+5:302021-07-07T04:23:10+5:30
गरोदर महिलांनी लस घेण्यापूर्वी काय काळजी घ्यावी गरोदर महिलांच्या लसीकरणाविषयी अनेकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने गरोदर ...
गरोदर महिलांनी लस घेण्यापूर्वी काय काळजी घ्यावी
गरोदर महिलांच्या लसीकरणाविषयी अनेकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने गरोदर महिलांसाठी कोविडची लस सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. गरोदर महिलांनी लस घेण्यापूर्वी काय काळजी घ्यावी, याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले की, सर्वसामान्यांनी लस घेण्यापूर्वी जी काळजी घ्यावी, तीच काळजी गर्भवतींनीही घेणे गरजेचे आहे. तसेच लस घेतल्यानंतर ताप आल्यास पॅरासिटामोल घेण्याचाही सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र, कुठलेही औषध घेण्यापूर्वी गर्भवतींनी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा, असे आवाहनदेखील डॉक्टरांनी केले आहे.
आतापर्यंत झालेले एकूण लसीकरण - २२ टक्के
पुरुष - २,२०,९७१
महिला - २,०४,७२२
पहिला डोस - ३,२८,२३५
दुसरा डोस - ९५,८२६
एकूण - ४,२५,७१२
जागतिक आरोग्य संघटनेने गर्भवतींनाही कोविड लसीकरणाचा मार्ग मोकळा केला आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता हा चांगला निर्णय आहे. लसीकरणामुळे गर्भवतींचेही कोरोनापासून संरक्षण करणे शक्य होईल.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला
लसीकरणामुळे गर्भवतींचे कोरोनापासून संरक्षण होण्यास मदत होईल. मात्र, गर्भवतींची प्रकृती ठीक नसेल, तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच लस घ्यावी.
- डॉ. श्यामकुमार सिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकाेला