‘मातृ वंदना सप्ताह’अंतर्गत गर्भवती महिलांचे होणार कोविड लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:40 AM2021-09-02T04:40:46+5:302021-09-02T04:40:46+5:30

राष्ट्रीय आरोग्य अभियान नियामक समितीची आर्थिक व भौतिक बाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसू, ...

Pregnant women will be vaccinated under 'Matri Vandana Saptah' | ‘मातृ वंदना सप्ताह’अंतर्गत गर्भवती महिलांचे होणार कोविड लसीकरण

‘मातृ वंदना सप्ताह’अंतर्गत गर्भवती महिलांचे होणार कोविड लसीकरण

Next

राष्ट्रीय आरोग्य अभियान नियामक समितीची आर्थिक व भौतिक बाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसू, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, महिला व बाल संगोपन अधिकारी डॉ. मनीष शर्मा, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक एम. एम. राठोड, जिल्हा कार्यकारी व्यवस्थापक संदीप देशमुख, आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.

मातृ वंदना सप्ताहामध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा विविध माध्यमाद्वारे प्रचार व प्रसिद्धी करावी, गर्भवती महिलेची नोंदणी, शिबिराचे आयोजन, महिलांकरिता कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना प्रोत्साहित करणे यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. योजनेची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आशासेविका व अंगणवाडी सेविकांचे सहकार्य घ्यावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिले.

यावेळी राष्ट्रीय आरोग्य मिशन, जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम, गर्भलिंग निदान व प्रतिबंध, आशा प्रशिक्षण, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन आदी विविध आरोग्यविषयक बाबीचा आढावा घेऊन शासनाकडून प्राप्त निधी तातडीने खर्च करण्याचे निर्देश यावेळी दिले.

Web Title: Pregnant women will be vaccinated under 'Matri Vandana Saptah'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.