जिल्हा स्त्री रुग्णालयात गर्भवतींच्या डोळ््यांचे स्क्रिनिंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 02:52 PM2020-02-25T14:52:46+5:302020-02-25T14:52:53+5:30
वर्षभरात ८ हजार ५०० महिला व पुरुषांची रेटिना स्क्रिनिंग करण्यात आली.
अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयात गर्भवतींसाठी डोळ््यांचा स्क्रिनिंग प्रोग्राम राबविण्यास सुरुवात करण्यात आली होती. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने सर्वसाधारण महिलांसोबत पुरुषांच्या डोळ््यांचीही स्क्रिनिंग करण्यास सुरुवात करण्यात आली. उपक्रमांतर्गत गत वर्षभरात ८ हजार ५०० महिला व पुरुषांची रेटिना स्क्रिनिंग करण्यात आली.
साधारणपणे आजार किंवा डोळ्याच्या तक्रारी समोर आल्यावर लोक तपासणी करतात; मात्र तक्रारी नसतील तरी नेत्र तपासणी करायला हवी. नियमित नेत्र तपासणीमुळे अंधत्व प्रतिबंधात ९५ टक्क्यांनी वाढ होते. त्यामुळे वर्षातून एकदा नेत्र तपासणी करणे आवश्यक ठरते. याशिवाय गरोदरपणातही रेटिनाची तपासणी करणे फायद्याचे ठरते. यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयातील गरोदर माता तपासणी कक्ष एकच्या समोर मोफत डोळे तपासणीसाठी अत्याधुनिक मशीनसह स्टॉल उघडण्यात आला आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत येथे नेत्रतपासणी सुरू असते. रुग्णालयात येणाऱ्या ८ हजारांपेक्षा जास्त गर्भवती व त्यांच्या नातेवाइकांनी स्क्रिनिंग टेस्टचा लाभ घेतला आहे. मधुमेहामध्ये अंधत्वाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे डोळ्यातील अस्पष्ट रेषा, अस्पष्ट ठिपके दिसल्यास ताबडतोब रेटिनाची तपासणी करा, असे आवाहन या उपक्रमांतर्गत करण्यात येते.
स्त्री रुग्णालयातील प्राथमिक नेत्र तपासणीचा प्रकल्प प्रामुख्याने गरोदर मातांसाठी होता; मात्र आता सर्वच महिला या तपासणीचा लाभ घेत आहेत. ज्यांना कोणता आजार किंवा त्रास नाही अशांसाठी ही स्क्रिनिंग आहे. मशीनद्धारे होणाºया तपासणीतून थेट निदान होत नसले तरी रुग्णांना नेमकी पुढील तपासणी आणि शक्यतेविषयी माहिती दिली जाते.
- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय