पश्चिम वऱ्हाडात अवकाळीचा कांदा बीजोत्पादनाला फटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:17 AM2021-04-16T04:17:47+5:302021-04-16T04:17:47+5:30

यावर्षीच्या हंगामात कांदा बियाण्यांचे दर वाढलेले होते. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा बीजोत्पादन घेण्यासाठी पुढाकार घेतला. पश्चिम वऱ्हाडात सुमारे आठ ...

Premature onion seed production hit in West Varada! | पश्चिम वऱ्हाडात अवकाळीचा कांदा बीजोत्पादनाला फटका !

पश्चिम वऱ्हाडात अवकाळीचा कांदा बीजोत्पादनाला फटका !

Next

यावर्षीच्या हंगामात कांदा बियाण्यांचे दर वाढलेले होते. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा बीजोत्पादन घेण्यासाठी पुढाकार घेतला. पश्चिम वऱ्हाडात सुमारे आठ ते नऊ हजार हेक्टरवर कांदा बीजोत्पादन घेतले जात आहे. यंदाचे पीक चांगल्या स्थिती असताना सलग दोन-तीन दिवस गारपिटीचा तडाखा बसला. त्यामुळे कांद्याची पात मोडली गेली. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बियाणे काढण्याच्या अवस्थेत असताना कांदा पिकाला सर्वाधिक तडाखा बसला. शेतकऱ्यांचा एकरी ४० हजारांपर्यंत सरासरी खर्च झालेला आहे. बियाण्याचे गेंद जमिनीवर आडवे झाले आहेत. मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे उत्पादनावर परिणाम दिसून येणार आहे.

--बॉक्स--

अशी आहे लागवड

बुलडाणा जिल्‍ह्यात या भागात सर्वाधिक ५३०० हेक्टरवर कांदा बीजोत्पादन घेतले जात होते, तर अकोल्यातही हजार आणि वाशीममध्ये दीड हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांदा बीजोत्पादन होत आहे.

--बॉक्स--

पीकविम्याचे कवच मिळावे !

कांदा बीजोत्पादन अत्यंत जोखीमेच्या कक्षेत मोडते. अवकाळी पावसामुळे वारंवार नुकसान होत असल्याने पुन्हा एकदा या पिकाचा पीकविम्याच्या कार्यकक्षेत समावेश होण्याची मागणी पुढे आली आहे.

Web Title: Premature onion seed production hit in West Varada!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.