अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात; केळीवेळीत रंगणार खासदार चषक कबड्डी महोत्सव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 08:20 PM2018-01-28T20:20:15+5:302018-01-28T20:26:02+5:30

अकोला : कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या ग्राम केळीवेळी येथे आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेसाठी केंद्रीय मंत्री, राज्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती स्पर्धा संयोजक माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांनी दिली.

Preparation of the All India Kabaddi Tournament in the final phase; Kabaddi Festival will be held in Keliveli! | अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात; केळीवेळीत रंगणार खासदार चषक कबड्डी महोत्सव!

अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात; केळीवेळीत रंगणार खासदार चषक कबड्डी महोत्सव!

Next
ठळक मुद्देकेंद्रीय मंत्री, राज्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभणारस्पर्धा संयोजक माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांनी पत्रपरिषदेत दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या ग्राम केळीवेळी येथे आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेसाठी केंद्रीय मंत्री, राज्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती स्पर्धा संयोजक माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांनी दिली.
रविवारी स्थानिक हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दाळू गुरुजी यांनी स्पर्धेविषयी माहिती सांगितली. केळीवेळी येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यावर्षी ७५ वर्ष पूर्ण करीत आहे. या हीरक महोत्सवी वर्षात अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ८ ते ११ फेब्रुवारी २0१८ या कालावधीत आयोजित या स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. समारोपासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याचे दाळू गुरुजी यांनी सांगितले.
स्पर्धेत १२ राज्यातील मुले व मुलींचे संघ येणार आहेत. महिला व पुरुष अशा दोन गटात स्पर्धा होतील. अन्य राज्यातून आलेल्या खेळाडूंची निवास आणि भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. प्रेक्षक व खेळाडू तसेच अन्य नागरिकांसाठी स्पर्धा कालावधीत अकोला, दहीहांडा बसस्थानकाहून अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. अकोला शहरापासून केळीवेळी गावापर्यंत ग्राम मंडळाचे फलक लावल्या जातील. मैदानावर स्वागत कक्ष, माहिती कक्ष उभारण्यात आला आहे. होणारी गर्दी लक्षात घेता रोज ड्रोन कॅमेरा व एलसीडीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. वैद्यकीय पथक, अग्निशमन दल स्पर्धास्थळी हजर राहणार असून, खेळाडू व प्रेक्षक यांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार असल्याचे दाळू गुरुजी यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार रणधीर सावरकर, अनिल गावंडे यांनीदेखील स्पर्धेविषयी माहिती सांगितली. पत्रकार परिषदेला गजानन मोंढे, डॉ. राजकुमार बुले, डॉ. जगन्नाथ ढोणे, दिनकर गावंडे, गणेश पोटे, धनंजय मिश्रा, गजूसिंह ठाकूर, वासुदेव नेरकर उपस्थित होते.

Web Title: Preparation of the All India Kabaddi Tournament in the final phase; Kabaddi Festival will be held in Keliveli!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.