लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची तयारी; मतदान कर्मचाऱ्यांना कार्यशाळेद्वारे प्रशिक्षण

By रवी दामोदर | Published: March 23, 2024 05:14 PM2024-03-23T17:14:54+5:302024-03-23T17:15:15+5:30

निवडणुकीची प्रत्येक जबाबदारी समजून व दक्षतापूर्वक पार पाडावी. राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या आदेश व सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश डॉ. जावळे यांनी दिले.

Preparation for Lok Sabha General Election; Training of polling staff through workshops | लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची तयारी; मतदान कर्मचाऱ्यांना कार्यशाळेद्वारे प्रशिक्षण

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची तयारी; मतदान कर्मचाऱ्यांना कार्यशाळेद्वारे प्रशिक्षण

अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने मनुष्यबळ प्रशिक्षण कार्यक्रमात मतदान केंद्राध्यक्ष व इतर अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. त्यामध्ये उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी मार्गदर्शन केले. मतदान पथकांनी करावयाचे कार्य, मतदान केंद्राध्यक्षाची भूमिका, ईव्हीएम, तसेच व्हीव्हीपॅट आदी यंत्रणा आदींबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली.

निवडणुकीची प्रत्येक जबाबदारी समजून व दक्षतापूर्वक पार पाडावी. राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या आदेश व सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश डॉ. जावळे यांनी दिले. निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे पार पाडावी यासाठी प्रात्यक्षिक, सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने  मनुष्यबळाचे प्रशिक्षण घेण्यात आले. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनात नियोजनभवन येथे ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट मशीनची माहिती देण्यासाठी  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी कार्यशाळेमध्ये उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे पार पाडावी याकरिता मार्गदर्शन केले. उपस्थित झोनल अधिकारी, सहाय्यक झोनल अधिकारी यांना ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट मशीन बाबत मास्टर ट्रेनर यांच्याकडून सखोल माहिती देण्यात आली, यावेळी अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Preparation for Lok Sabha General Election; Training of polling staff through workshops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला