अकाेलेकरांची फॅन्सी नंबरसाठी लाखमाेलाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:34 AM2020-12-15T04:34:41+5:302020-12-15T04:34:41+5:30
अकाेला : महागड्या वाहनांना फॅन्सी नंबर घेऊन स्वत:चा एक वेगळा ब्रॅन्ड असल्याचे दाखविण्यासाठी एक, ७७, ७७७ हे क्रमांक सुमारे ...
अकाेला : महागड्या वाहनांना फॅन्सी नंबर घेऊन स्वत:चा एक वेगळा ब्रॅन्ड असल्याचे दाखविण्यासाठी एक, ७७, ७७७ हे क्रमांक सुमारे तीन लाख रुपये शुल्क भरून घेण्यात येत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या माध्यमातून आरटीओला वर्षाकाठी माेठे उत्पन्नही मिळत असल्याची माहिती समाेर आली आहे.
अकाेलेकर १, ११, १११, ११११ या क्रमांकासाेबतच ७, ७७, ७७७ आणि ७७७७ या क्रमांकाची जास्त मागणी करीत असल्याची माहिती आहे. हे क्रमांक मिळविण्यासाठी जास्त रक्कमही माेजण्यात येत असून काहींनी तर प्रत्येक सिरीजमधील एक क्रमांक त्यांच्यासाठी कितीही रक्कम घेऊन बुक करण्याचेच ठरविले आहे. सात वर्षांपूर्वी फॅन्सी क्रमांकाचे दर तीन पटीने वाढविले हाेते. त्यामुळे १ क्रमांक घ्यायचा असल्यास अकाेलेकरांना आता तीन लाख रुपये शुल्क द्यावे लागत आहे. तर आता या नियमामध्ये आणखी बदल हाेणार असल्याने यासाठी तब्बल पाच लाख रुपये माेजावे लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या तीन नंबर्सला जास्त मागणी
७ दीड लाख रुपये
७७ दाेन लाख रुपये
७७७ ७० हजार ते दीड लाख रुपये
आरटीओची कमाई
२०१९ ५२ लाखांच्या घरात
२०२० ४५ लाखांच्या आसपास
फॅन्सी नंबरसाठी मागणी माेठी असते. एक या क्रमांकासाठी तीन लाख रुपये शुल्क आहे. तर आता नवीन नियमानुसार ही किंमत पाच लाख रुपये हाेणार आहे. किंमत वाढली तरीही फॅन्सी नंबरचे शाैकिन क्रमांकाची मागणी करतात.
विनाेद जिचकार
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकाेला
७, ७७, ७७७, ७७७७ या क्रमांकांना मागणी
आकड्यांची बेरीज सात हाेईल अशा नंबरची माेठ्या प्रमाणात मागणी अकाेलेकरांची आहे. ७, ७७, ७७७ आणि ७७७७ या चार क्रमांकासाेबतच २५००, ३४००, ४३००, ५२००, ६१०० या क्रमांकासही मागणी आहे. यासाेबतच १००१, १, अशा नंबरलाही ब्रॅन्ड म्हणून काही राजकीय पदाधिकारी वापरत आहेत.