२७३ ग्रा.पं.च्या निवडणुकांची तयारी!

By Admin | Published: April 15, 2017 01:38 AM2017-04-15T01:38:24+5:302017-04-15T01:38:24+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठविली राज्य निवडणूक आयोगाकडे माहिती

Preparations for the election of 273 gp! | २७३ ग्रा.पं.च्या निवडणुकांची तयारी!

२७३ ग्रा.पं.च्या निवडणुकांची तयारी!

googlenewsNext

संतोष येलकर - अकोला
येत्या आॅक्टोबर ते डिसेंबरमध्ये पाच वर्षांच्या कालावधीची मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली असून, मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागामार्फत गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात ५४० ग्रामपंचायती आहेत.
त्यापैकी २७३ ग्रामपंचायतींच्या पाच वर्षांच्या कार्यकाळाची मुदत येत्या आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत संपत आहे. पाच वर्षांच्या कालावधीची मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुुकांची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत पाच वर्षांची मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागामार्फत १३ एप्रिल रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली आहे.

निवडणूक कार्यक्रम लवकरच ?
येत्या आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत पाच वर्षांच्या कालावधीची मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका मुदत संपण्यापूर्वी घेण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे राज्य निवडणूक आयोगामार्फत पाच वर्षांच्या कालावधीची मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

Web Title: Preparations for the election of 273 gp!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.