राष्ट्रसंतांचा सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी महोत्सवाची तयारी जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 02:46 PM2018-12-04T14:46:39+5:302018-12-04T14:46:48+5:30
अकोला: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी महोत्सव २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत अकोल्यात मोठ्या थाटात साजरा करण्यात येणार आहे.
अकोला: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी महोत्सव २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत अकोल्यात मोठ्या थाटात साजरा करण्यात येणार आहे. यासाठी शिवाजी महाविद्यालयात रविवारी गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळावा घेण्यात आला असून, तयारी जोरात सुरू करण्यात आली आहे.
राष्ट्रसंतांच्या ५० व्या पुण्यतिथी महोत्सवाचे निमित्ताने गुरुदेव सेवा मंडळाचा जिल्हा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. अभय पाटील होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. रामेश्वर भिसे, सग्रामभय्या गावंडे, प्रा. नितीन बाठे, जगदीश मुरुमकार, कृष्णा अंधारे, काशीराम गावंडे, सावळे गुरुजी, धनंजय मिश्रा, सचिन महल्ले, डॉ. स्वप्निल ठाकरे, बलदेवराव पाटील, अरविंदराव घोगरे उपस्थित होते.
यावेळी सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी महोत्सव अधिक भव्य दिव्य, शिस्तबद्ध व्हावा याकरिता विविध समित्यांचे गठन करून अनेकांनी या त्रिदिवसीय महोत्सवाला मदत करण्याचा संकल्प व्यक्त केला. अनेकांनी स्वयंस्फूर्तीने जबाबदारी स्वीकारून आपला सहभागी होण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख गुरुजी, अॅड. संतोष भोरे, गजानन काकड, सहदेव खांबलकर, सुरेश राऊत, अनिल हरणे, बंडू बोदडे, गजानन जळमकर, शुभम वरणकार, राम उपाध्याय, मुकेश वाकोडे, सहदेव आखरे, भास्कर वानखडे, गोपाल राऊत, प्रदीप गिºहे, गजानन हरणे, नारायण मानकर, शरद पुंडकर यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन शिवाजी म्हैसने यांनी, तर आभार संतोष भोरे यांनी मानले. राष्ट्रवंदनेने मेळाव्याचा समारोप झाला.