महासंस्कृती महोत्सावाची तयारी जोरात; विविध समित्या गठित! पाच दिवस कार्यक्रमांची मेजवानी

By रवी दामोदर | Published: January 30, 2024 04:28 PM2024-01-30T16:28:15+5:302024-01-30T16:28:26+5:30

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय व संनियंत्रण समिती गठित करण्यात आली

Preparations for the Mahasanskruti Festival in full swing Formed various committees! A feast of events for five days | महासंस्कृती महोत्सावाची तयारी जोरात; विविध समित्या गठित! पाच दिवस कार्यक्रमांची मेजवानी

महासंस्कृती महोत्सावाची तयारी जोरात; विविध समित्या गठित! पाच दिवस कार्यक्रमांची मेजवानी

रवी दामोदर, अकोला: जिल्ह्यामध्ये पाच दिवसीय दि. १२ ते १६ फेब्रुवारीदरम्यान महासंस्कृती महोत्सव होणार असून,  जिल्हा प्रशासनाकडून तयारी जोरात सुरू करण्यात आली आहे. महोत्सवाच्या समन्वय व संनियंत्रणासाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. जिल्हावासियांसाठी पाच दिवस विविध कार्यक्रमांची मेजवाणी राहणार आहे.

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय व संनियंत्रण समिती गठित करण्यात आली असून, त्यात जि. प. सीईओ, पोलीस आयुक्तांसह अनेक अधिका-यांचा समावेश आहे. निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव असून, अशासकीय सदस्यांमध्ये डॉ. गजानन नारे, सीमा शेट्ये, किशोर बळी, प्रशांत असनारे, प्रा. मधु जाधव, गीताबाली उजवणे, रमेश थोरात, दिलीप देशपांडे, सचिन गिरी, पुष्पराज गावंडे यांचा समावेश आहे. जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन व समारोप कार्यक्रम समिती गठित करण्यात आली असून, त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त व इतर अधिका-यांचा समावेश आहे. अप्पर जिल्हाधिकारी सदस्य सचिव आहेत.

'या' समित्या केल्या गठित

प्रचार व प्रसिद्धी समिती, साहित्यिक उपक्रम समिती, महिला समिती, सूत्रसंचालन समिती, पंचकमेटी समिती, सांस्कृतिक व विविध स्पर्धा समिती, विविध प्रदर्शने समिती, आरोग्य उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य सेवा समिती, उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा, मैदान व्यवस्थापन, वाहतूक समिती, तसेच उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांच्या समावेशासह भोजन व निवास व्यवस्था समिती, बैठक व्यवस्था समिती, अति. जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा व्यवस्था समिती आदी समित्या गठित करण्यात आल्या आहेत.

Web Title: Preparations for the Mahasanskruti Festival in full swing Formed various committees! A feast of events for five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला