अकोल्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाच्या तयारीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 04:38 PM2017-11-09T16:38:15+5:302017-11-09T16:41:20+5:30
अकोला: गत बारा वर्षांपासून अकोला शहरातील स्वराज्य भवन प्रांगणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाची तयारी प्रारंभ करण्यात आली आहे.
अकोला: गत बारा वर्षांपासून अकोला शहरातील स्वराज्य भवन प्रांगणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाची तयारी प्रारंभ करण्यात आली आहे. या वर्षी राष्ट्रसंतांच्या ४९ वा पुण्यतिथी महोत्सव अनेक उपक्रमाने साजरा करण्यात येणार आहे.
दि.२३ डीसेंबर ते २५ डिसेंबर पर्यंत चालणाºया या तीन दिवसीय महोत्सवात राष्ट्रसंतांच्या विचारांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वैचारिक मंथन होणार आहे. नवतरुणात राष्ट्रसंतांच्या विकास व सामाजिक उन्नतीचे विचार रुजविण्यासाठी समितीच्या वतीने अनेक कार्यक्रमांची रेलचेल स्वराज्य भवन प्रांगणात असते. यात प्रवचन, भजन, बाल भजने, राष्ट्रीय कीर्तनकारांनी कीर्तने, युवक व महिला कार्यकर्ता संमेलन, सर्वधर्म मौन श्रद्धांजली, योग प्राणायाम, व्यसनमुक्ती, वैचारिक प्रबोधन सोहळा, सुफी वैचारिक भजने, नामवंत प्रचारक व साहित्यिकांची उपस्थिती आदी कार्यक्रम या संमेलनाचे वैशिष्ट्य असते. प्रारंभ दिनी राजेश्वर मंदिरापासून राष्ट्रसंतांनी शेकडो गुरुदेव भक्तांसमवेत भव्य शोभायात्रा काढण्यात येत असते. यावर्षीही अशीच वैचारिक प्रबोधनाची मेजवानी गुरुदेवभक्तांना मिळणार आहे. या संदर्भात समितीची बैठक समितीचे अध्यक्ष बलदेवराव पाटील यांच्या उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली. यावेळी रविंद्र मुंडगावकर, शेख गुरुजी, डॉ.त्र्यंबकराव आखरे, डॉ.गजानन काकड, अॅड.संतोष भोरे, डॉ.प्रकाश मानकर, सहदेवराव खांबालकर, रवींद्र पाटील, अनिल हरणे, सुरेश राऊत, ज्ञानेश्वर साकारकर, शिवाजीराव म्हैसने, वसंत माळी, तुळशीराम चतरकार, डॉ.अजय उपाध्याय, पांडुरंग वाराणकर, नारायण मानकर, भास्कर वानखडे समवेत समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .