"गरज अन् शक्यता लक्षात घेऊन जिल्हा विकासाचे 'व्हिजन डॉक्युमेंट' तयार करा"

By संतोष येलकर | Published: October 16, 2023 02:59 PM2023-10-16T14:59:43+5:302023-10-16T15:01:05+5:30

पालकमंत्र्यांचे निर्देश: जिल्ह्यातील विकासकामांचा घेतला लेखाजोखा

Prepare a 'Vision Document' for district development keeping in mind the needs and possibilities, Radhakrishna Vikhe Patil | "गरज अन् शक्यता लक्षात घेऊन जिल्हा विकासाचे 'व्हिजन डॉक्युमेंट' तयार करा"

"गरज अन् शक्यता लक्षात घेऊन जिल्हा विकासाचे 'व्हिजन डॉक्युमेंट' तयार करा"

संतोष येलकर

अकोला: जिल्ह्यातील विविध विभागांच्या विकासकामांचा आढावा घेत, जिल्ह्यातील विकासकामांची गरज व पुढील काळात विकासाच्या शक्यता लक्षात घेऊन परिपूर्ण 'व्हिजन डॉक्युमेंट' तयार करण्याचे निर्देश राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित विविध विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस आधीक्षक संदीप घुगे आदी उपस्थित होते. प्रत्येक विभागाने आवश्यक विकासकामे व विकासप्रक्रियेला दिशा देण्यासाठी येत्या काळात अपेक्षित बदलांचा वेध घेऊन सादरीकरण तयार करावे पुढील वेळी त्याचा आढावा घेण्यात येणार असल्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

अकोट तालुक्यासह व इतर तालुक्यांतही  वर्गखोल्या शिकस्त असल्याने पाडण्यात आल्या. त्यावेळी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते; मात्र तसे करण्यात आले नसल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी कक्ष नाहीत, याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी असल्याचे सांगत मनरेगा, जिल्हा नियोजन निधी आदींतुन कालमर्यादित कार्यक्रम निश्चित करून हे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यात दुग्धोत्पादन विकासासाठी मुरघास, वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी प्रस्ताव देण्याचे सांगत,जलयुक्त शिवार योजना टप्पा २ मध्ये १ हजार ६७४ कामे नियोजित आहेत. यापूर्वीच्या कामांतील गेटची कामे  पूर्ण करून वाढीव निधीची गरज असल्यास प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

' जल जीवन मिशन ' च्या
कामांचे फलक १५ दिवसात लावा!

'जल जीवन मिशन' मध्ये जिल्ह्यात  जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदकडून सुरू असलेल्या कामांची सद्य:स्थिती, खर्च, नकाशे, झालेली कामे आदी  माहिती देणारे फलक पुढील १५ दिवसांत लावण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, आरोग्य, शिक्षण, वने, आदिवासी विकास आदी विविध विभागांचा आढावा पालकमंत्र्यांनी यावेळी घेतला.

Web Title: Prepare a 'Vision Document' for district development keeping in mind the needs and possibilities, Radhakrishna Vikhe Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.