देशी बीटी कापसाचे बियाणे तयार; येत्या हंगामात शेतकऱ्यांना देणार ५५ हजार पॅकेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 02:52 PM2018-10-14T14:52:51+5:302018-10-14T14:53:25+5:30

अकोला : लोकप्रिय देशी कपाशी वाणात जनुकीय बदल करू न पीकव्ही-२ बीटी, बीजी-२ ही दोन देशी बीटी कपाशीचे वाण विकसित करण्यात महाराष्ट्र राज्य बियाणे (महाबीज) महामंडळाला यश आले.

 Prepare seeds of native Bt cotton; 55 thousand packets will be given to farmers | देशी बीटी कापसाचे बियाणे तयार; येत्या हंगामात शेतकऱ्यांना देणार ५५ हजार पॅकेट 

देशी बीटी कापसाचे बियाणे तयार; येत्या हंगामात शेतकऱ्यांना देणार ५५ हजार पॅकेट 

Next

- राजरत्न सिरसाट
अकोला : लोकप्रिय देशी कपाशी वाणात जनुकीय बदल करू न पीकव्ही-२ बीटी, बीजी-२ ही दोन देशी बीटी कपाशीचे वाण विकसित करण्यात महाराष्ट्र राज्य बियाणे (महाबीज) महामंडळाला यश आले असून, पुढच्या वर्षी शेतकºयांना ५५ हजार पॅकेट उपलब्ध करू न देण्याचे उद्दिष्ट असल्याने यावर्षी देशातील विविध भागात या वाणांचे पीक प्रात्यक्षिक घेण्यात आले.
अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तत्कालीन मुख्य कापूस शास्त्रज्ञ डॉ. एम. ए. तय्यब यांनी १९८१ मध्ये विकसित केलेले पीकेव्ही ४६८ कपाशीचे तसेच परभणीच्या नांदेड-४४ (एनएच-४४) वाणात जनुकीय बदल करण्यात महाबीजला यश आले आहे. बोंडअळी व रसशोषण करणाºया किडींना प्रतिकारक्षम हे वाण असून, पुढच्या वर्षी शेतकºयांना पेरणीसाठी हे वाण उपलब्ध करू न देण्याचे उद्दिष्ट असल्याने राज्यातील अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख, परभणीचे स्व. वसंतराव नाईक तसेच राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांच्या प्रक्षेत्रासह गुजरातमध्ये यावर्षी या वाणाचे मोठ्या प्रमाणात प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. पीकेव्ही ४६८ या संकरित कपाशी वाणांची दोन दशके प्रचंड मागणी होती. महाराष्टÑासह आंध्र प्रदेश, गुजरातमध्ये हे प्रचंड लोकप्रिय होते. तद्वतच नांदेड-४४ (एनएच-४४) हे संकरित कपाशीचे वाण मराठवाडा, खान्देशात प्रचंड लोकप्रिय होते. तब्बल दोन दशके अधिराज्य गाजविलेले दोन्ही वाण बीटीने प्रवेश केल्यानंतर मात्र मागे पडले. याच दोन्ही संकरित वाणांमध्ये जनुकीय (बीटी जीन) बदल करू न बीटी वाण विकसित करण्यात आले आहे. अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख, परभणीचे स्व. वसंतराव नाईक मराठवाडा व राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या समन्वयाने एका परदेशी कंपनीकडून बीटी जनुक तंत्रज्ञान मिळविण्यासाठी करार करण्यात आला. मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या संशोधनाला आता यश आले असून, मागच्या वर्षी चाचणी घेतल्यानंतर यावर्षी या दोन्ही वाणांचे बीजोत्पादन प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. पुढच्या वर्षीच्या खरीप हंगामात शेतकºयांना हे बियाणे उपलब्ध केले जाणार आहे.

- पीकेव्ही-४६८ व नांदेड-४४ या संकरित कापूस वाणात जनुकीय बदल करू न (बीटी जीन टाकून) बीटी-२, बीजी-२ कपाशीचे वाण विकसित करण्यात आले आहे. पुढच्या खरीप हंगामात शेतकºयांना ५५ हजार पॅकेट या बीटीचे उपलब्ध करू न देण्याचे उद्दिष्ट आहे.
ओमप्रकाश देशमुख,
व्यवस्थापकीय संचालक,
महाबीज, अकोला.

 

Web Title:  Prepare seeds of native Bt cotton; 55 thousand packets will be given to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.