वीस दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दहिहंडा परिसरात पावसाची हजेरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:25 AM2021-08-18T04:25:24+5:302021-08-18T04:25:24+5:30

दहिहंडा : परिसरात जुलै महिन्याच्या अखेरीस झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानंतर ...

Presence of rain in Dahihanda area after waiting for twenty days! | वीस दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दहिहंडा परिसरात पावसाची हजेरी!

वीस दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दहिहंडा परिसरात पावसाची हजेरी!

Next

दहिहंडा : परिसरात जुलै महिन्याच्या अखेरीस झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानंतर गत वीस दिवस पावसाने दडी दिल्याने पिके संकटात सापडली होती. अखेर प्रतीक्षेनंतर मंगळवारी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून, पिकांना संजीवनी मिळाली आहे.

अकोला तालुक्यातील दहिहंडा येथील परिसरात वीस दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. परिसरात यंदा खरीप हंगामातील पिकांची स्थिती चांगली असल्यामुळे शेतशिवारात पिके बहरली आहेत. सद्या परिसरात शेती मशागतींच्या कामांना वेग आला आहे. यामध्ये निंदण, डवरणी, वखरणी, खतांची मात्रा देणे, फवारणी, आदी कामांना वेग आला आहे. मात्र, गत वीस दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने तापमानात वाढ झाली होती. उन्हाचा तडाखा वाढल्याने शेतातील पिकांनी माना खाली टाकणे सुरू केले होते. तसेच काही पिके सुकण्याच्या मार्गावर होते. त्यानंतर गत वीस दिवसांनी पावसाने हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे.

--------------------

शेतशिवारात फवारणीला वेग

पावसाने दडी दिल्याने खरीप हंगामातील पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केल्याने पिके संकटात सापडली आहेत. कपाशी, सोयाबीन, तूर पिकांवर मावा, तुडतुडा, उंट अळी, बुरशी, आदी रोगांनी अटॅक केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. पिके वाचविण्यासाठी शेतकरी फवारणी करीत असून, महागड्या कीटकनाशकाची फवारणी करीत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

170821\img_20210817_150752.jpg

फोटो

Web Title: Presence of rain in Dahihanda area after waiting for twenty days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.