विजांच्या कडकडासह अवकाळी पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:17 AM2021-03-20T04:17:23+5:302021-03-20T04:17:23+5:30
आगर: परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडांसह जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, मका, फुलशेती आणि फळबागांचं ...
आगर: परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडांसह जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, मका, फुलशेती आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतित झाला आहे. अवकाळी पावसामुळे भाजीपाला उत्पादक धास्तावले आहेत.
जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. आगर परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. गुरुवारी दि. १८ मार्च रोजी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान ढगाळ वातावरण तयार होऊन वादळ वाऱ्यास सुरुवात झाली. त्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह शेतात मुक्कामी असलेल्या मेंढपाळांची चांगलीच तारांबळ उडाली होती. शेतात गुरांचा चारा असल्याने शेतकऱ्यांनी पाण्यापासून बचाव करण्यासाठी घाई केली होती. अवकाळी पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला होता. या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, फुलशेती बरोबरच भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत होती.
------------------------
वीज पुरवठा खंडित
परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावताच परिसरातील वीज पुरवठा काही तास खंडित झाला होता. पावसाची तीव्रता कमी होताच वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.