महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष अकाेल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:19 AM2021-01-20T04:19:35+5:302021-01-20T04:19:35+5:30
मनपा कर्मचाऱ्यांना न्याय द्या! अकोला:मनपातील २५ कर्मचाऱ्यांना सन १९९८ मध्ये काेणतेही कारण न देता सेवेतून कमी केले हाेते. कामगार ...
मनपा कर्मचाऱ्यांना न्याय द्या!
अकोला:मनपातील २५ कर्मचाऱ्यांना सन १९९८ मध्ये काेणतेही कारण न देता सेवेतून कमी केले हाेते. कामगार न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. तरीही प्रशासनाने सदर कर्मचाऱ्यांना न्याय दिला नाही. यामुळे शासनाने न्याय द्यावा,अशी मागणी शहर काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आकाश सिरसाट, भूषण गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
गरजू महिलेला किराणा वाटप
अकाेला:स्थानिक हनुमान चौक येथील गरजू महिलेला रामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने किराणा साहित्य देण्यात आले. यावेळी आ.गाेवर्धन शर्मा, नितीन राऊत,राजेंद्र गिरी, रमेश करीहार, टोनी जयराज, राजेश रेड्डी ,रुपेश जाधव, शेषराव खवले, अर्चना गुंडेवार, सुषमा शुक्ला, शकुंतला जाधव, नितीन जाधव, कुलदीप दुबे, आरती चौधरी, राजेश चौधरी आदी उपस्थित होते.
शास्ती याेजनेला हवी मुदतवाढ
अकाेला:शहरातील मालमत्ता धारकांकडे थकबाकी असेल तर त्यांना नियमानुसार दाेन टक्के शास्तीचा दंड आकारला जाताे. मागील तीन वर्षांपासून मनपाने शास्ती अभय याेजनेला सतत मुदतवाढ दिली आहे. प्रशासनाने याेजनेला ३१ डिसेंबरपर्र्यंत मुदतवाढ दिली हाेती. ती संपुष्टात आली असून याेजनेला मुदतवाढ देण्याची मागणी हाेत आहे.
मनपाला विकास निधी प्राप्त
अकाेला: सुवर्णजयंती नगराेत्थान याेजनेंतर्गत शासनाकडून महापालिकेला साडेचार काेटींचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये मनपाला ३० टक्के आर्थिक हिस्सा जमा करावा लागणार असून एकूण ५ काेटी ८५ लाख रुपयांतून प्रस्तावित विकास कामे निकाली काढल्या जाणार आहेत. नगरसेवकांनी दिलेल्या प्रस्तावानुसार विकास कामे केली जातील.
दलित वस्ती याेजना;निधी मंजूर
अकाेला: महापालिका प्रशासनाला दलित वस्ती सुधार याेजने अंतर्गत साडेचार काेटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्राप्त निधीतून नाली, रस्ते,पथदिवे आदी विकास कामे केली जातील. या निधीतून प्रभागातील विकास कामे निकाली काढण्यासाठी नगरसेवकांची धांदल सुरु झाली आहे.
रस्त्यांवर माती, वाहनधारक त्रस्त
अकाेला: शहरातील प्रमुख रस्त्यांची मनपातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दैनंदिन साफसफाई करणे क्रमप्राप्त असताना कर्मचाऱ्यांकडून थातूरमातूर साफसफाई केली जात आहे. रस्त्यांची झाडपूस केल्यानंतर जमा झालेली माती ट्रॅक्टरमध्ये जमा न करता दुभाजकांलगत मातीचे ढीग लावल्या जात असून धुळीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
माेहम्मद अली चाैकात स्वच्छता
अकाेला: माेहम्मद अली चाैक परिसरात अत्यंत दाटीवाटीने व्यावसायिकांची दुकाने आहेत. याठिकाणी मनपाने नियमित साफसफाई करणे अपेक्षित असताना तसे हाेत नसल्याचा आराेप व्यावसायिकांमधून केला जात आहे. मच्छी मार्केटमध्ये मांसाचे तुकडे उघड्यावर फेकल्या जातात.यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
पडिक प्रभाग वाऱ्यावर;‘एसआय’झाेपेत
अकाेला: मनपाच्या आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांना प्रशासकीय प्रभागातील तसेच खासगी सफाई कर्मचाऱ्यांना पडिक प्रभागातील नाले,सार्वजनिक जागा, रस्त्यांची साफसफाई करण्याची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. परंतु सफाई कर्मचाऱ्यांवर मनपाच्या आराेग्य निरीक्षकांचे नियंत्रण नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी साफसफाईकडे पाठ फिरवल्याने नाले, गटारे तुंबल्याचे दिसून येत आहे.