जिल्हा कारागृहातील हवालदार विठ्ठल उगले यांना राष्ट्रपती पारितोषिक
By आशीष गावंडे | Published: January 25, 2024 07:42 PM2024-01-25T19:42:30+5:302024-01-25T19:42:43+5:30
वालदार उगले मागील २२ वर्षांपासून पोलीस दलात सेवारत आहेत.
अकोला: पोलीस सेवेत उत्कृष्ट सेवा बजाविणाऱ्या जिल्हा कारागृहातील हवालदार विठ्ठल श्रीराम उगले यांना राष्ट्रपती पारितोषिक जाहीर झाले आहे. उद्या २६ जानेवारी रोजी पुणे येथे राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या हस्ते विठ्ठल उगले यांना सन्मानित केले जाणार आहे.
पोलीस दलात पूर्ण निष्ठा, साहस व प्रामाणिकपणे कर्तव्य बजाविणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पारितोषिक दिले जाते. मागील २२ वर्षांपासून पोलीस दलात अत्यंत प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या जिल्हा कारागृहात हवालदार पदावर कार्यरत विठ्ठल श्रीराम उगले यांच्या कामाची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पारितोषिक जाहीर झाले आहे. उद्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त विठ्ठल उगले यांना पुणे येथे राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. हवालदार उगले मागील २२ वर्षांपासून पोलीस दलात सेवारत आहेत.