पणज येथे महालक्ष्मी माता मंदिरात मूर्तींची प्राणप्रतिष्ठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:13 AM2020-12-07T04:13:47+5:302020-12-07T04:13:47+5:30
बोर्डी नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिराच्या समोरच एक पुरातन दीपमाळ व पायविहीर आहे. पुरातन काळापासून सर्वत्र महाराष्ट्रात ...
बोर्डी नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिराच्या समोरच एक पुरातन दीपमाळ व पायविहीर आहे. पुरातन काळापासून सर्वत्र महाराष्ट्रात ओळखले जाणारे जागृत मंदिर आहे. पणज येथील महालक्ष्मी माता मंदिरात हजारो भाविक महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी पणज नगरीत दाखल होत असतात; परंतु यावर्षी सात ते आठ महिने मंदिर कोरोनामुळे बंद होते. आता शासनाने मंदिराला परवानगी दिली असून, भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत. शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करीत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क लावल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. पणज येथील महालक्ष्मी माता मंदिरात शासनाच्या आदेशाचे व नियमांचे काटेकोरपणे पालन केल्या जात आहे. कार्यक्रमाला महिला व पुरुष भाविकांची उपस्थिती होती.
फोटाे: