हरभरा सोंगणीचे दर महागले; शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:18 AM2021-02-13T04:18:33+5:302021-02-13T04:18:33+5:30
अमोल साबळे नया अंदुरा : खारपाणपट्ट्यात असलेल्या नया अंदुरा परिसरात हरभरा सोंगणीला सुरुवात झाली आहे. यंदा हरभरा सोंगणीचे दर ...
अमोल साबळे
नया अंदुरा : खारपाणपट्ट्यात असलेल्या नया अंदुरा परिसरात हरभरा सोंगणीला सुरुवात झाली आहे. यंदा हरभरा सोंगणीचे दर वाढले असल्याने शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांना ४०० रुपये जास्त मोजावे लागत आहे.
खारापाणपट्ट्यातील नयाअंदुरा, कारंजा रमजानपुर, अंदुरा, हाता, शिंगोली, बहादुरा, कवठा,निंबा फाटा परिसरात परतीच्या पाऊसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मूग, उडीद, पिकाचे उत्पादन बुडाले, तर सोयाबीन, कपाशी, तूर व ज्वारी इत्यादी पिकांचे नुकसान झाले. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला. दरम्यान, पैशांची जुळवाजुळव करून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरणी केली. यंदा परिसरातील शेतकऱ्यांनी हरभऱ्याला अधिक पसंती दिली आहे. सद्यस्थितीत परिसरात हरभरा सोंगणीला सुरुवात झाली आहे. गतवर्षी हरभरा सोंगणीचा दर प्रति एकर १४००रुपये होता;मात्र यंदा शेतकऱ्यांना १८०० रुपये मोजावे लागत आहे.तसेच काढणीचे दरही वाढल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
---------------------------------------
४५ किलो प्रति एकर
परिसरात हरभरा सोंगणी हरभऱ्यानेही सुरू आहे. यासाठी शेतकऱ्याला प्रती एकर सोंगणीसाठी ४५ किलो हरभरा मोजावा लागत आहे. त्याप्रमाणेे हरभऱ्याच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांचा लागवडी खर्चही वसूल होत नसल्याचे चित्र आहे.
---------------------------
उत्पादनात घट
वातावरणातील बदलांमुळे हरभऱ्याच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे.ऐन फुलधारणेच्या अवस्थेत असताना ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडत असलेल्या धुक्यामुळे हरभऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा हरभऱ्याचा उतारा २ ते ३ क्विंटलच होत आहे. (फोटो) तीन कॉलम
---------------------------------