अकोल्याच्या बाजारपेठेत मुगाचे दर कोसळले, पण फुलांचे दर गगनाला भिडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 02:16 PM2018-09-14T14:16:42+5:302018-09-14T14:17:02+5:30

अकोला बाजारपेठेत मुगाचे दर घसरले; पण फुलांच्या दरात तेजी आल्याने शेतकरी, घाऊक व्यापाऱ्यांसह किरकोळ व्यापाºयांना चांगला नफा मिळत आहे.

 The price of the mug fell in Akola market, but the prices of flowers raised | अकोल्याच्या बाजारपेठेत मुगाचे दर कोसळले, पण फुलांचे दर गगनाला भिडले!

अकोल्याच्या बाजारपेठेत मुगाचे दर कोसळले, पण फुलांचे दर गगनाला भिडले!

Next

अकोला बाजारपेठेत मुगाचे दर घसरले; पण फुलांच्या दरात तेजी आल्याने शेतकरी, घाऊक व्यापाऱ्यांसह किरकोळ व्यापाºयांना चांगला नफा मिळत आहे.
अकोल्याची शेतमाल, किराणा बाजारपेठ, नावाजलेली असून, येथे दररोज होणारा शेतमाल, किराणा दराचा चढ-उतार यावरच या भागातील दर अवलंबून असतात. सध्या खरिपातील पहिले पीक मुगाची आवक सुरू आहे; पण केंद्र शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीनुसार शेतकºयांकडील मूग खरेदी केला जात नसल्याचे चित्र आहे. मुगाची आधारभूत किंमत प्रतिक्ंिवटल ६ हजार ९०० रुपये आहे; पण बाजारात आजमितीस ३,५०० ते सरासरी ४,३०० रुपये प्रतिक्ंिवटल याप्रमाणे खरेदी केली जात आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे गत दहा वर्षांपासून या भागातील मुगाचे क्षेत्र कमी झाले. याही परिस्थितीत शेतकºयांनी यावर्षी मुगाची पेरणी केली; पण सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने व्हायचे तेच झाले, मुगाचे उत्पादन प्रचंड घटले. अनेक ठिकाणी एकरी एक ते दीड क्ंिवटलच उत्पादन होत असल्याने अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवकही दररोज सरासरी १ हजार १२४ क्ंिवटलपर्यंत स्थिरावली आहे. आधारभूत किमतीच्या निम्मेच दर येथे मिळत असल्याने शेतकरी इतर पर्याय शोधत आहेत. उडीद पिकाची आधारभूत किंमत प्रतिक्ंिवटल ५,६०० रुपये आहे; पण उडीदही प्रतवारीनुसार खरेदी केला जात असून, सर्वात कमी दर ३,९०० रुपये प्रतिक्ंिवटल आहेत. सरासरी हे दर ४,२०० रुपये प्रतिक्ंिवटल आहेत. उडिदाची आवक ही फार कमी असून, दररोज सरासरी १३९ क्ंिवटलपर्यंत आहे.
सणासुदीचे दिवस असल्याने फुलांचे दर वाढले आहेत. गणेशोत्सवामध्ये फळ व फुलांची मागणी वाढल्याने विविध फुलांच्या भावात दुपटीने वाढ झाली आहे. २०० ते २५० रुपये शेकडा मिळणारा गुलाब आता ५०० रुपयांवर पोहोचल्याने फुलातूनही महागाईचा सुगंध येत आहे. मागील आठवड्यात मिळणाºया एक किलो फुलांसाठी जेवढे पैसे द्यावे लागत होते, तेवढेच पैसे आता एक पाव फुलासाठी मोजावे लागत आहेत. सोमवार, मंगळवारपर्यंत काही प्रमाणात स्थिर असलेले हे दर बुधवारपासून प्रतिकिलोचे दर दुपटीने वाढले आहेत.

Web Title:  The price of the mug fell in Akola market, but the prices of flowers raised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.