तुरीचे दर घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 01:05 PM2018-12-26T13:05:39+5:302018-12-26T13:05:54+5:30

अकोला: यावर्षी तुरीचे उत्पादन घटले असून, दरही कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. म्हणूनच शासनाने शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

The prices have dropped | तुरीचे दर घटले

तुरीचे दर घटले

googlenewsNext

अकोला: यावर्षी तुरीचे उत्पादन घटले असून, दरही कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. म्हणूनच शासनाने शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. बाजारात तुरीचे दर सध्या सरासरी प्रतिक्ंिवटल ४,४०० रुपये आहेत. हमीदरापेक्षा हे दर १,२७५ रुपयांनी कमी आहेत.
यावर्षी महाराष्टÑ स्टेट को-आॅप फेडरेशनच्यावतीने प्रस्ताव मागविण्यात आले आहेत, असे असले तरी खरेदी प्रत्यक्षात खरेदी सुरू केव्हा होते, हे महत्त्वाचे आहे. बाजारात नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे; पण उत्पादन प्रचंड घटले असून, एकरी ७५ किलो ते एक क्ंिवटलपर्यंत आहे. शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्याने सध्यातरी तूर उत्पादक भागातील बाजारात सरासरी आवक दोनशे पन्नास क्ंिवटलपर्यंत सुरू आहे. अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी २७५ क्ंिवटलपर्यंत तुरीची आवक सुरू आहे. यावर्षी कापूस, मूग, उडीद इतर सर्वच खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटल्याने शेतकºयांना तूर विकण्यावाचून पर्याय नाही म्हणूनच अल्पभूधारक शेतकºयांना तूर विकावी लागत आहे. अशावेळी शासनाने किमान आॅनलाइन नोंदणी सुरू करण्याची गरज आहे, अन्यथा गतवर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकºयांची लूट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
तुरीला यावर्षी ५,६७५ रुपये हमीदर जाहीर करण्यात आला आहे; पण खरेदी केंद्रच सुरू झाले नसल्याने या दराचे करायचे काय, असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला असून,बाजारात तुरीचे दर ४,८०० पर्यंत होते त्यात ३०० ते ४०० रू पयाने घट झाली आहे.
फेडरेशनने आता खरेदी केंद्र सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव सहकारी संस्थांकडून मागविले आहेत. प्रस्तावात अनेक अटी असल्याने किती संस्था खरेदी केंद्र सुरू करण्यास तयार होतात, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. फेडरेशन प्रतवारी, आर्द्रतेचे निकष लावून तूर खरेदी करते, यावर्षी दुष्काळी स्थिती असल्याने हे निकष काही प्रमाणात शिथिल करण्याची गरज तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

- शेतकरी व्यापाºयांना कमी दरात तूर विकत असल्याने शासनाने तूर खरेदीसाठीची आॅनलाइन नोंदणी तातडीने सुरू करण्याची गरज आहे. ज्या शेतकºयांनी कमी दरात तूर विकणे सुरू केले, त्यांना भावांतर योजनेंतर्गत हमीदरातील फरक देण्याची घोषणा करावी.
डॉ. प्रकाश मानकर,
चेअरमन,
भारत कृषक समाज (महाराष्ट्र)

 

Web Title: The prices have dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.