यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनचे दर वाढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:47 PM2018-10-03T12:47:24+5:302018-10-03T12:49:38+5:30
अकोला : सोयाबीनचे दर यावर्षी बºयापैकी असून, सध्या सरासरी प्रतिक्ंिवटल तीन हजार रुपयांवर हे दर असल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे; पण काही ठिकाणी कमी पावसाचा परिणाम झाल्याने सोयाबीनचे उत्पादन घटले आहे.
अकोला : सोयाबीनचे दर यावर्षी बºयापैकी असून, सध्या सरासरी प्रतिक्ंिवटल तीन हजार रुपयांवर हे दर असल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे; पण काही ठिकाणी कमी पावसाचा परिणाम झाल्याने सोयाबीनचे उत्पादन घटले आहे.
सुरुवातीला पाऊसाला उशीर झाला असला तरी यावर्षी शेतकºयांनी सोयाबीनला पसंती देत खरीप हंगामात ३८ लाख हेक्टरपर्यंत पेरणी केली आहे; पण पेरणी होताच चांगला पाऊस झाल्याने हे पीक बहरले; परंतु ऐन फुलोºयाच्या अवस्थेत असताना पावसाचा दीर्घ खंड पडल्याने सोयाबीन पिकावर प्रतिकूल परिणाम झाला असून, उत्पादनात घट झाली आहे; पण परतीच्या पावसाने दिलासा दिल्याने ज्या शेतकºयांनी उशिरा पेरणी केली होती तेथील सोयाबीन उत्तम आहे. उत्पादनही बºयापैकी आहे. मागच्यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला हे दर १,८०० ते २,२०० पर्यंत होते, ते यावर्षी प्रतिक्ंिवटल २,९०० ते ३,३०० पर्यंत आहेत. मराठवाडा व इतर सोयाबीन उत्पादक भागात सोयाबीन काढणीला सुरुवात झाली असून, वºहाडातील पाच जिल्ह्यात येत्या आठवड्यात सोयाबीन बाजारात येणार आहे. त्यामुळे बाजारात आज जे दर आहेत तेच दर कायम राहणे गरजेचे आहे, असे शेतकºयांचे म्हणने आहे.
अकोल्याची बाजारपेठ मोठी असून, या बाजारात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक होत असते, यावर्षी काढणी हंगामाच्या सुरुवातीला ४८६ क्विंटल आवक आहे. ही आवक आता वाढणार आहे.