भाजीपाल्याचे भाव घसरले; शेतकरी अडचणीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:16 AM2021-01-17T04:16:37+5:302021-01-17T04:16:37+5:30
अवैध वृक्षतोड वाढली; वन विभागाचे दुर्लक्ष बाळापूर : तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांचे काम सुरू आहे. या कामात वृक्षांची अवैध ...
अवैध वृक्षतोड वाढली; वन विभागाचे दुर्लक्ष
बाळापूर : तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांचे काम सुरू आहे. या कामात वृक्षांची अवैध कत्तल होत असल्याचे चित्र आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात लाकूड माफियांकडूनही वृक्षतोड वाढली आहे. तालुक्यातील खिरपुरी-बारलिंगा रस्त्यावर झाडांची कत्तल केल्याचे दिसून येत आहे. (फोटो)
----------------------------------
बाळापूर शहरातील हातपंप बंदच!
बाळापूर : शहरातील अनेक हातपंप बंदच असल्याने नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. याबाबत तक्रार केल्यानंतर हातपंपाची दुरुस्ती करण्यात येते; मात्र अवघ्या काही दिवसांतच हातपंप बंद पडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
--------------------------------
उमरवाडी परिसरात पाणीटंचाईची समस्या
पांढुर्णा : येथून जवळच असलेल्या उमरवाडी येथे पाणीटंचाईची समस्या वाढली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
------------------------------
खापरखेड-भांबेरी रस्त्याची दयनीय अवस्था
भांबेरी : खापरखेड-भांबेरी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने रस्त्याने वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
----------------------------
मन नदीच्या पुलावरील कठड्यांची दुरवस्था!
बाळापूर : बाळापूर-पारस रस्त्यावरील भिकुंडखेडनजीक असलेल्या मन नदीच्या पुलावरील कठड्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे लक्ष देऊन कठडे बसविण्याची मागणी होत आहे.
-------------------------------
शिर्ला गावात सांडपाणी रस्त्यावर
शिर्ला : गावात नाल्यांची साफसफाई होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहात आहे. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, दुर्गंधी पसरली आहे. परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
-------------------------------
वीजपुरवठा खंडित; नागरिक त्रस्त
पातूर: शहरासह तालुक्यात शुक्रवार, १५ जानेवारी रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. तालुक्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे.
------------------------------------------
तेल्हारा शहरातील मुत्रीघरांची दुरवस्था!
तेल्हारा : शहरातील मुत्रीघरांची दुरवस्था झाल्याने काही नागरिक उघड्यावर घाण करत असल्याने अन्य नागरिकांचे आरोग्यही धोक्यात सापडले आहे. याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. शहरात ग्रामीण भागातून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मुत्रीघरांच्या दुरवस्थेमुळे महिलांची कुचंबणा होत आहे.
---------------------------------
पातूर-मोर्णा रस्त्यावर जीवघेणा खड्डा!
पातूर : पातूर-मोर्णा रस्त्यावरुन सांडपाणी वाहत आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्डा पडला असून, या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने येथील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.